काँग्रेसची भीती, अदानीची महागडी वीज राज्यातील वीजग्राहकांचे कंबरडे मोडणार अदानी पॉवरकडून सध्याच्या वीजखरेदी दरापेक्षा दुप्पट दरवाढीचा प्रस्ताव

महागाईच्या आगीत सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना आता वीज दरवाढीच्या संकटालाही तोंड द्यावे लागणार आहे. अदानी पॉवरने वीजदरात दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव महावितरणला सादर केला आहे. ही दरवाढ मान्य केल्यास राज्यातील वीज ग्राहकांना महागाईचा मोठा शॉक बसणार आहे त्यामुळे भाजपा सरकारने या दरवाढीला मंजुरी देऊ नये, अशी मागणी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केली.

यासंदर्भात माहिती देताना काँग्रेस सरचिटणीस राजेश शर्मा म्हणाले की, राज्यातील वीजेची गरज भागवण्यासाठी महावितरण अदानी पॉवरकडूनही वीज खरेदी करत असते पण अदानी पॉवरकडून २०२३-२४ सालासाठी ६.५५ रुपये दराने वीज खरेदीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा दर ३.९२ रुपये प्रति युनिट असा आधी मंजुर केलेला आहे. तर २०२४-२५ साठी ६.६० रुपये प्रति युनिट दर अदानीने प्रस्तावीत केला आहे. आधी मंजूर केलेला दर ३.८९ रुपये प्रति युनिट आहे. कोळशाच्या कमतरतेचे कारण देत ही दरवाढ करण्यात आल्याचा अदानी पॉवरचा दावा आहे. प्रत्यक्षात कोळशापोटी अदानीला १६८० कोटी रुपये वाढीव खर्च दाखवला आहे. पण या दरवाढीतून अदानी पॉवरला मोठा फायदा होणार आहे.

राज्य सरकारला या महागड्या वीज खरेदीसाठी पुढील दोन वर्षात २१ हजार कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे. अदानी पॉवरकडून दोन्ही वर्षाचे प्रति युनिट दर ६.५५ रुपये आणि ६.६० रुपये पाहता मंजूर केलेल्या दरांच्या तुलनेत ६७%-६९%. जास्त आहेत. अदानी पॉवरचे दर हे इतर वीज कंपन्यांपेक्षा अधिक जास्त आहेत. तरीही सरकार अदानीवरच मेहरबानी दाखवत आहे. या दरवाढीला सरकारने मंजुरी दिल्यास याचा भार वीज ग्राहकांवरच पडणार असून आधीच महागाईच्या खाईत लोटलेल्या जनतेला आणखी दरवाढीचे चटके सहन करावे लागतील, असेही राजेश शर्मा म्हणाले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामतीत जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला संवाद..

बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची काँग्रेस पक्षाशी ठाम भूमिका होती व कार्यकर्त्यांमध्येही दांडगा उत्साह होता म्हणूनच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *