मराठा समाजाच्या परिस्थितीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर आयोगाच्या सदस्यांनी मुख्य सचिवांना केला सुपूर्द

मुंबई : प्रतिनिधी
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीबाबतचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांना सुपूर्द करण्यात आला.
मुख्य सचिवांच्या समिती कक्षात आयोगाचे सदस्य सचिव डी. डी. देशमुख यांनी मुख्य सचिवांना अहवाल सुपूर्द केला. यावेळी आयोगाचे तज्ज्ञ सदस्य अंबादास मोहिते उपस्थित होते. आयोगाने सादर केलेला अहवालाचा अभ्यास करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

About Editor

Check Also

१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकाऱाचा पहिल्यांदा प्रश्न मांडला

आधुनिक अर्थव्यवस्थेत ग्राहक हा केंद्रबिंदू मानला जातो. बाजारपेठेत वस्तू आणि सेवा तयार करणारे उत्पादक, व्यापारी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *