सामाजिक

काय असते तबलिगी इज्तेमा? औरंगाबादेत नुकत्याच पार पडलेल्या इज्तेमाच्या पार्श्वभूमीवर

औरंगाबाद : जगदीश कस्तुरे नुकताच औरंगाबादला लाखो लोकांच्या उपस्थितीत “तबलिगी इज्तेमा” सुरु झाला आहे. त्यानिमीत्ताने हा काय प्रकार असतो याचे कुतुहल मराठी माणसांत जागं झालं आहे. म्हणून आपण तबलिगी जमातचा आधी परिचय करून घेऊ. पाठीवर भलेमोठे बॅग, पिशव्या, गाठोडं वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा घातलेले लांब लांब दाढी, टोपीवाल्यांचा जत्था रस्त्याने …

Read More »

नेत्रदानास प्रवृत्त करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी देशभरात नेत्रदान करण्यास इच्छुक नेत्रदात्यांसाठी असंख्य आय बँक कार्यरत आहेत. मात्र, नागरिकांमध्ये नेत्रदानाविषयीची उत्सुकता नसल्याचे दिसून येते. नागरिकांना याकरिता प्रवृत्त करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. नेत्रदानाच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्हिजन फाऊंडेशन आफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

इज्तेमासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तब्बल ५ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात

औरंगाबाद : प्रतिनिधी लिंबे जळगाव भागात होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमासाठी देशभरातून लाखो भाविक येणार असल्याने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. औरंगाबाद आयुक्तालयाचे ३ तर बाहेरून २ हजार असे तब्बल ५ हजार अधिकारी आणि कर्मचारी या बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. इस्तमाचे ठिकाण, पार्कीग आणि रस्त्यावर अशा तीन ठिकाणी हा बंदोबस्त …

Read More »

नोंदणी असेल तरच सरकारी बांधकामाचा ठेका मिळणार काँट्रक्टर आणि ठेकेदारांना नोंदणी करण्याचे कामगार मंत्री निलंगेकर पाटील यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व काँट्रक्टर आणि ठेकेदारांनीही नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करणाऱ्या ठेकेदार आणि काँट्रक्टरला सरकारी काम मिळणार नसल्याची घोषणा कामगार मंत्री संभाजीराव निलंगेकर पाटील यांनी …

Read More »

दिव्यांग, वरिष्ठ नागरिक, वंचितांसाठी राज्यात ११ विशेष न्यायालये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना जलद न्याय मिळावा यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. या घटकासंबंधी एक हजारहून अधिक प्रकरणे प्रलंबित असलेल्या ११ ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्याचा आज बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे या घटकांना जलद न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे. दिव्यांग, वरिष्ठ …

Read More »

“जोडीदार मज निर्व्यसनीच हवा” घोड्यावर स्वार तरुणींचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी घोड्यावर स्वार जोडपे व तरूणी रंगीबिरंगी मुखवटे परिधान करुन ढोल ताशांच्या गजरात व्हँलेनटाईन डे दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्यावतीने व्यसनमुक्तीची मिरवणुक नरिमन पाँईट येथे आज काढण्यात आली. या मिरवणूकीच्या निमित्ताने “निर्व्यसनीच जोडीदार मज हवा” या अनोख्या कार्यक्रमातून जनजागृतीही करण्यात आली. व्यसन म्हणजे प्रेमाचा शत्रू. कारण प्रेम …

Read More »

मुंबईतील स्मशानभूमींना सवलतीच्या दरात पाईप गॅस द्या पेट्रोलियम मंत्री प्रधान यांच्याकडे मुंबई अध्यक्ष अॅड शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी पर्यावरण पुरक असणारा पाईप गॅस मुंबईतील स्मशानभूमींना सवलतीने देण्यात यावा अशी मागणी आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिल्लीत भेटून केली. नॅचरल गॅस हा पर्यावरण पुरक असून स्मशानभूमींना तो सवलतीने उपलब्‍ध करून दिल्यास लाकाडाचा वापर करून पर्यायाने झाडांची कत्तल …

Read More »

नागराज मंजुळे, सुधारक ओलवे यांना समष्टी पुरस्कार 'सारं काही समष्टीसाठी' सोहळा १५ फेब्रुवारी रोजी तर जे.जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ढसाळ लिटरेचर फेस्टिवल

मुंबई: प्रतिनिधी पद्मश्री नामदेव ढसाळ स्मृती ‘सारं काही समष्टीसाठी’ सोहळा १५ फेब्रुवारी रोजी मुंबईतील जे.जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये रंगणार आहे. यावर्षी ढसाळ स्मृती समष्टी पुरस्काराने दिग्दर्शक व कवी नागराज मंजुळे, सुधारक ओलवे यांना सन्मानित केले जाणार आहे तर समष्टीचा विशेष गोलपिठा युवा पुरस्कार कवी सुदाम राठोड यांना प्रदान केला जाणार …

Read More »

राज्यापाठोपाठ आता केंद्र सरकारमधील एससी-एसटी कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द केंद्रीय प्रशासकिय न्यायालयाचा अर्थात कँटचा निर्णय

नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयातील नागराज विरूध्द केंद्र सरकारच्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या विविध खात्यातील एससी-एसटीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळालेली पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून मुळ पदावर नियुक्ती द्यावी असे आदेश केंद्रीय प्रशासकिय न्यायालयाने अर्थात कँटने केंद्र सरकारला दिला आहे. तसेच या आदेशाची अंमलबजावणी पुढील ९० दिवसात करण्याचे आदेशही दिले. …

Read More »

आठवले, आंबेडकरांना वगळून दलित संघटनांचा सरकारच्या विरोधात महामोर्चा भीमा कोरेगांव प्रकरणी संविधान परिवाराच्या नावाखाली निघणार मोर्चा

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव प्रकरणा नंतर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी विधानभवनावर दलित समाजातील सर्व संघटनांच्यावतीने संविधान परिवाराच्यावतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या महामोर्चापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांना लांब …

Read More »