“जोडीदार मज निर्व्यसनीच हवा” घोड्यावर स्वार तरुणींचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी

घोड्यावर स्वार जोडपे व तरूणी रंगीबिरंगी मुखवटे परिधान करुन ढोल ताशांच्या गजरात व्हँलेनटाईन डे दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्यावतीने व्यसनमुक्तीची मिरवणुक नरिमन पाँईट येथे आज काढण्यात आली. या मिरवणूकीच्या निमित्ताने “निर्व्यसनीच जोडीदार मज हवा” या अनोख्या कार्यक्रमातून जनजागृतीही करण्यात आली.

व्यसन म्हणजे प्रेमाचा शत्रू. कारण प्रेम हे अनंत काळाची साथ तर व्यसन हे निव्वळ थोड्या वेळाची करमणूक असते. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे प्रेम. मनाचा व शरीराचा सुंदर बंध म्हणजे प्रेम. हेच बंध अडी अडचणीत दुःखात आधार ठरतात. व्यसने आधारापोटी कवटाळली जातात. परंतु व्यसने ही आधार नाहीत हे समजून घेतले पाहिजे. जी व्यक्ती व्यसनांना आधार मानते त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचा आधार आपणांस ढासळताना दिसत असतो. व्यसनाधिनतेकडे वाढत चाललेली युवकांची वाटचाल थांबविण्याच्या उद्देशाने या दिलखुलास कार्यक्रमाचे आयोजन नरिमन पाँईट येथे असणाऱ्या प्रेमी युगुलांसाठी करण्यात आला होता.

यावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, मराठी सिने अभिनेते सिध्दार्थ जाधव, मकरंद अनासपुरे, स्वप्निल जोशी, दिलीप प्रभावळकर, प्रिया बापट, देवदत्त नागे, जयवंत भालेकर यांच्या हस्ते संदेशाचे वाटप कण्यात आले. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. ज्यात शेकडो तरुणींनी आई बाबा नको मला बंगला गाडी, फक्त शोधा व्यसनमुक्त गडी, हा संकल्प केला.

About Editor

Check Also

डॉ बाबासाहेब आंबेडकरः आंबेडकरवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या बारामती येथील राज्यस्तरीय राजकिय परिषदेतील भाषणाचा संपादित भाग

सर्वप्रथम आंबेडरवादी विचार काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. अर्थात मर्यादित वेळेत जे मी मांडणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *