मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण देशभरात सामाजिक, राजकिय आणि आर्थिकस्तरावर हाहाकार माजला आहे. त्यामुळे देशात सामजिक सलोखा बिघडलेला आहे. तर अल्पवयीन मुली आणि महिलांचे जीवन धोक्यात आले असून सर्वसामान्य नागरीकांना न्याय देणाऱ्या न्यायपालिकेतील सावळा गोंधळावर भाष्य करण्यासाठी चार न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. यावरून देशात लोकशाहीचे मोठ्या प्रमाणावर अवमुल्यन होत असून …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष : आंबेडकर चळवळीचे भवितव्य ? काल आणि आज
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या चळवळीचा मुख्य हेतु होता तो सर्व प्रकारचा वर्चस्ववाद नष्ट करणे. आंबेडकरी चळवळ म्हणजे वर्चस्ववादा विरुध्द उभारण्यात आलेला लढा. हा वर्चस्ववाद सांस्कृतिक होता, सामाजिक होता, राजकीय होता, शैक्षणिक होता, प्रतिष्ठेचा होता. हा वाद वैदिक धर्माने जोपासला असल्यामुळे वेद म्हणजेच भेद हे प्रमेय अस्तित्वात आले होते …
Read More »डॉ. आंबेडकर जयंती दिन विशेष : स्त्रियांच्या हक्क – अधिकारांसाठी हिंदू कोड बील स्त्रीवाद प्रत्यक्षात उतरविण्यासाठीचा लढा
आज २१ व्या शतकातही मुस्लीम स्त्रीयांना ट्रीपल तलाक साठी लढा द्यावा लागत आहे. त्यांना आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढा देण्याचते स्वातंत्र हे कायद्याने प्राप्त झाले आहे. ट्रीपल तलाक कायद्याने रद्द करण्यास मुस्लीम महिलांना यश प्राप्त झाले आहे. आज समाजात ही परिस्थिती असेल तर स्वातंत्र्यापूर्वी महिलांची काय सामाजिक स्थिती असेल याचा …
Read More »डॉ. आंबेडकर जयंती दिन विशेष : दलित-आदीवासींना जोडणारा एक डॉ. आंबेडकरी विचार धागा डॉ. संजय दाभाडे एक समर्पक कार्यकर्ता
समाज परिवर्तनाच्या आणि जाती अताच्या लढाईमध्ये विविध विचारधारा, मतप्रवाह आणि कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. प्रबोधनाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये अठराव्या शतकापासूनच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी संघर्षाची बीजे रोवली आणि पुरोगामी भूमिका घेऊन काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्यात मोलाची भर घातली. आंबेडकरी चळवळ असो वा समाजवादी किंवा डावी भूमिका …
Read More »आपलं शहर करा हरित स्वच्छ- सुंदर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व महापालिका, नगरपालिकांना पत्र पाठवित आवाहन
मुंबई : प्रतिनिधी राज्यात वन विभागाने लोकसहभागातून महावृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत शहरातील नागरिकांनीही सहभागी व्हावं आणि आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करावं, असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करत अशा आशयाचे पत्र राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिकांना, नगराध्यक्ष, महापौर यांना पाठविले आहे. याच पत्रात त्यांनी शहरवासियांना देखील वृक्ष …
Read More »आदीवासी जमिन विक्रीच्या मान्यतेचे अधिकार आम्हाला द्या मंत्र्यांच्या बैठकीत महसूल विभागीय आयुक्तांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आदीवासी समाजाच्या शेत जमिनी विक्रीस मान्यता देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे असले तरी सुज्ञ नागरीकांकडून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणूक करत त्यांच्या जमिनी बळकाविण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसून येतात. तरीही आदीवासींच्या जमिन खरेदीस मान्यता देण्याचे अधिकार विभागीय स्तरावर देण्याची मागणी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत महसूल …
Read More »धनगर आरक्षण पेटण्याची शक्यता? रासप आणि राज्य सरकारबाबत धनगर ऐक्य परिषदेत भूमिका ठरणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सत्ता आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यास आता साडेतीन वर्षे झाली. त्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झाली करण्यात आली नाही. यापार्श्वभूमीवर येत्या २२ एप्रिलला सांगलीत धनगर ऐक्य परिषदेने समाजाचा महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यात धनगर …
Read More »प्रवीण भोटकर यांना “डॉ.आंबेडकररत्न पुरस्कार” जाहीर इकॉनॉमिक्स अँड सोशल अफेअर्स आणि फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉनचा पुरस्कार
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक संघटनेचे संथापक अध्यक्ष प्रवीण समाधान भोटकर यांना अमेरिकेतील संयुक्त राष्ट्र संघाच्या इकॉनॉमिक्स अँड सोशल अफेअर्स आणि फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन”डॉ.आंबेडकर रत्न ग्लोबल चेंजमेकर्स अवॉर्ड”हा …
Read More »अखेर अनाथ मुलांना १ टक्के आरक्षण मिळणारच शासन निर्णय प्रसिध्द
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध अनाथ आश्रमात राहणाऱ्या अनाथांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर जगण्यासाठी जातीपासूनच्या सर्व अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या मुला-मुलींना शासकिय नोकऱ्यांपासून ते शासकिय लाभापर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी पात्र होता येत नव्हते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथांना १ …
Read More »अमराठी भाषिकांना मराठी भाषा शिकण्याचे दरवाजे उघडले राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम
मुंबई : प्रतिनिधी अमराठी भाषिक लोकांकरिता राज्य मराठी विकास संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या जर्मन भाषा विभाग यांनी मराठी भाषा अध्ययन पध्दत हा प्रकल्प संयुक्तरित्या हाती घेतला आहे. जगात कुठेही, कोणालाही मराठी भाषा शिकण्यासाठीचे परिपूर्ण साधन आजघडीला यामुळे निर्माण होण्यास मदत होणार आहे. गेल्या १०० वर्षांत जर्मन भाषा अध्यापनाच्या क्षेत्रात प्रचंड संशोधन आणि विकास …
Read More »
Marathi e-Batmya