कोरोना चाचणी केली नसल्याने माजी मुख्यमंत्र्यांसह २५ जणांना प्रवेश नाकारला कॉंग्रेस आमदार अमिन पटेल यांनी उपस्थित केला मुद्दा

मुंबईः विशेष प्रतिनिधी

अर्थसंकल्पिय अधिवेशन कालावधीत दोन वेळा कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असताना काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह २५ आमदारांनी चाचणीच केली नसल्याने विधिमंडळात प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. जरी आमदारांनी चाचणी केली नसली तरी त्यांना विधिमंडळात प्रवेश द्यावा अशी मागणी काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी विधानसभेत केली.

अधिवेशनाच्या सुरुवातीला कोरोनाची चाचणी केल्यानंतर पुन्हा एकदा एका आठवड्यानंतर कोरोना चाचणी करणे विधिमंडळाच्या सर्व सदस्य अर्थात आमदार मंत्र्यांबरोबर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली. चाचणी केल्यानंतर निगेटीव्ह अहवाल असेल तरच विधिमंडळात प्रवेश मिळणार आहे. परंतु या २५ आमदारांना चाचणी करण्याचा निरोप मिळाला नसल्याने त्यांनी चाचणी केली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या आमदारांमध्ये काँग्रेस, शिवेसना, भाजपा सदस्यांचा समावेश असल्याचे कळते. त्यामुळे या आमदारांनी चाचणीच केली नसल्याने आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पास त्यांना उपस्थिती लावता येणार नाही. तसेच पुढील उर्वरीत दोन दिवसाच्या अधिवेशनासाठी हजेरी अंधातरीच राहणार आहे.

कोरोना चाचणी अनिवार्य केल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने आमदारांना अधिवेशनाला गैरहजर रहावे लागत आहे. परंतु या आमदारांनी आज चाचणी केल्यानंतर त्याचा निगेटीव्ह अहवाल सादर केल्यास पुन्हा उर्वरीत दोन दिवसासाठी हजेरी लावता येणार आहे. परंतु या सर्वांनी कोरोना चाचणी करणे गरजेचे असल्याचे मत विधिमंडळातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

About Editor

Check Also

पंतप्रधान यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी तो फोटोच आरसा म्हणून दाखवला राज शिष्टाचार न पाळता अपमान केला असल्याच्या आरोपाला जशास जते उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्या अलिकडच्या राज्य दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *