अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स शहराच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन स्ट्रीटवर एका ट्रकने गर्दीत घुसविला आणि त्यानंतर ट्रक चालकाने ट्रकमधून उतरून अंदाधुंद गोळाबार केला. या घटनेत नववर्षाच्या पहिल्याच अर्थात १ जानेवारी २०२५ रोजी बुधवारी किमान १० लोक ठार आणि ३० जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
भरधाव वेगात असलेल्या ट्रकने थेट गर्दीत घुसवला, आणि चालकाने वाहनातून बाहेर पडून शस्त्राने गोळीबार करण्यास सुरुवात केली, या अंदाधुद गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केल्याचे सीबीएस न्यूजने साक्षीदारांचा हवाला देत वृत्त दिले. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना पाच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
न्यू ऑर्लीन्सचे महापौर लाटोया कँट्रेल यांनी या घटनेला “दहशतवादी हल्ला” म्हटले आहे. तथापि, बुधवारी पहाटे वाहन गर्दीत घुसले तेव्हा काय घडले याचा तपास एफबीआय करत आहे.
”न्यू ऑर्लीन्स पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने सीबीएस न्यूज आणि बीबीसीच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर फिरत असलेल्या या घटनेचे अनेक व्हिडिओ बाहेर आले आहेत या व्हिडिओत अनेक जखमी लोक रस्त्यावर पडलेले असल्याचे दिसून येत आहे.
नोला रेडी, न्यू ऑर्लीन्स यांनी एक्स X वर पोस्ट केले, “कॅनल आणि बोर्बन स्ट्रीटवर मोठ्या प्रमाणात अपघाती घटना घडली आहे. शहरातील सीझर्स सुपरडोममध्ये आयोजित कॉलेज फुटबॉल क्वार्टर फायनल ऑलस्टेट बाउलच्या किकऑफच्या काही तास आधी आणि शहरातील नवीन वर्षाच्या उत्सवाच्या शेवटी ही घटना घडली – हजारो लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा होती.
गेल्या परेडमध्ये गोळीबार आणि कारची जमावाशी टक्कर झाल्याच्या घटना या शहराने पाहिल्या आहेत – स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये न्यू ऑर्लीन्स परेड मार्ग आणि उत्सवादरम्यान दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन लोक ठार झाले आणि १० जण जखमी झाले.
Marathi e-Batmya