पंतप्रधान मोदी यांचा आरोप, राजद आणि काँग्रस बिहार विरोधी ऑपरेशन सिंदूरपासून बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा चवथा दौरा

बिहारमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२० जून, २०२५) सिवानला भेट दिली आणि बिहारला दलदलीत नेल्याबद्दल विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलावर टीका केली, गेल्या एका दशकात बिहारला पुढे नेण्यासाठी एनडीए NDA सरकारने केलेल्या कामांची यादी वाचून दाखविली. पंतप्रधान मोदींनी ₹ ९.५ कोटी किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही केली आणि पाटणा येथील पाटलीपुत्र स्टेशनपासून पूर्व उत्तर प्रदेशातील गोरखपूरपर्यंत वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजद-काँग्रेस बिहार विरोधी, गुंतवणूक विरोधी आहेत. दोघेही बिहारमधील माफिया राज, गुंडा राज आणि भ्रष्टाचाराचे रक्षक आहेत,” असा आरोप पंतप्रधान मोदींनी बिहारच्या सिवान जिल्ह्यातील जसोली येथे जाहीर सभेला संबोधित करताना केला.

जानेवारीपासून, पंतप्रधान मोदींचा हा निवडणुकीच्या तोंडावर असलेला बिहारचा चौथा दौरा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.

गेल्या एका दशकात देशात चार कोटींहून अधिक लोकांना पक्की घरे मिळाली आहेत आणि येत्या काळात त्यांना आणखी तीन कोटी घरे दिली जातील असे सांगताना, पंतप्रधान मोदी म्हणाले, “पण तरीही मोदी विश्रांती घेणार नाहीत आणि गरीब, दलित, महादलित, अत्यंत मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय लोकांसाठी काम करत राहतील आणि, माझ्यासाठी अधिक समाधानाची गोष्ट म्हणजे यापैकी बहुतेक घरे आमच्या माता आणि बहिणींच्या नावावर नोंदणीकृत आहेत,” असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारकडून त्यांना मोफत रेशन, वीज आणि पाणी दिले जाते, परंतु हात आणि कंदीलचे प्रतीक असलेले (काँग्रेस आणि राजद) देश लुटण्यात सहभागी होते आणि तरीही ते संधी शोधत आहेत, असेही यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारमधील या पक्षांनी केलेल्या कल्याणकारी उपाययोजनांचा सर्वात वाईट फायदा गरीब, दलित, महादलित, ईबीसी आणि ओबीसी लोकांना झाला, असा आरोप करत त्यांच्या अलीकडील परदेश दौऱ्यांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताच्या जलद प्रगतीने सर्व नेते प्रभावित झाले आहेत. भारत लवकरच जगातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश बनेल आणि बिहार यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, गेल्या एका दशकात देशातील २५ कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे आणि ३.७५ कोटी लोकांपैकी ३.७५ कोटी लोक बिहारचे आहेत, त्यामुळे देशातून गरिबी हटवता येते हे एनडीएने दाखवून दिले असल्याचेही स्पष्ट करत ते बाबा साहेब आंबेडकरांचा अपमान करतात, पण मी बाबा साहेबांना माझ्या हृदयात ठेवतो असे सांगत राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे नाव न घेता टीका केली.

तसेच पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी (राजद आणि काँग्रेस) परिवार का साथ, परिवार का विकास (कुटुंबासाठी लाभ) पण आमच्यासाठी, सबका साथ, सबका विकास (सर्वांसाठी लाभ) आहे. बिहार हे मेक-इन-इंडिया कार्यक्रमाचे एक मोठे केंद्र असेल, असे जाहिर करत केले.

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी सिवान सभेच्या व्यासपीठावरून ₹९.५ कोटी किमतीचे अनेक विकास प्रकल्प समर्पित केले आणि पाटण्यातील पाटलीपुत्र स्टेशन ते पूर्व उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाणारी वंदे भारत ट्रेन देखील सुरू केली.

सिवानला त्यांचा दौरा जिल्ह्यासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात होता कारण येथे मुस्लिम, यादव आणि दलित लोकसंख्या मोठी आहे आणि पारंपारिकपणे तो राजदचा बालेकिल्ला मानला जातो. सिवानची सीमा सारण आणि गोपाळगंज जिल्ह्यांशी देखील आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे सिवानमधील झिरादेई येथील होते आणि पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात प्रसाद यांच्या बौद्धिक वारशाचा उल्लेख केला.

About Editor

Check Also

हिमंता बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप, गौरव गोगाई आणि त्यांच्या पत्नीचे पाकिस्तानी एजंटशी संबध आसाम निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते गोगाई यांच्यावर आरोप

काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *