कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला ३० लाखाचे पारितोषिक मुख्यमंत्र्यांकडून पुरस्काराची घोषणा

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथे केली.

कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची ही कामगिरी उल्लेखनीय व अभिनंदनीय बाब आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने संकेत सरगरला ३० लाख रुपये तर त्याच्या मार्गदर्शकांनाही साडेसात लाखांचे पारितोषिक जाहीर केला. संकेतची कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

About Editor

Check Also

आता भारतीयांच्या स्वयंपाकघरासाठी पाण्यावर चालणारा स्टोव्ह पण सर्वसामान्यांना न परवडणारा

भारतातील एक नवीन हायड्रोजन कुकिंग स्टोव्ह एलपीजी सिलिंडर पूर्णपणे काढून टाकून स्वयंपाकघराच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *