मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार होम क्वारंटाईन ? वर्षावर मुक्काम मंत्री आदित्य ठाकरे संपर्कात आल्याने निर्णय

मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे एकच खळबळ माजली असतानाच मंत्री आदित्य ठाकरे यांचा कोरोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आदित्यच्या संपर्कात आल्याने पुढील ८ ते १० दिवस होम क्वारंटाईन होणार असून हा संपूर्ण कालावधी मुख्यमंत्री वर्षा या शासकिय निवासस्थानी राहणार असल्याची माहिती विश्वसनीय माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहित गंभीर आरोप केले. त्यांनी लिहिलेले पत्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले. या संगळ्या गोंधळातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र मंत्री आदित्य ठाकरे हे कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती पुढे आली. तसेच आदित्य यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी आणि विलगीकरणात रहावे असे आवाहन केले.

त्यानुसार काल शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला कि नकारात्मक आला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क आल्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे होम क्वारंटाईन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पुढील काळात कितपत सक्रिय कामकाजात राहतील याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

About Editor

Check Also

पश्चिम बंगालमध्ये माशांचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी छेडला, मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्याकडून तातडीने प्रत्युत्तर उत्तर देत पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा बरीच माहिती दिली

पश्चिम बंगालमध्ये, बंगाली घरांमध्ये मुख्य अन्न असलेला त्यांचा लाडका मासा स्वयंपाकघरातून थेट निवडणूक प्रचारात पोहोचला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *