काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप, हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या वक्तव्यावरून केली टीका

एकाबाजूला भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेली कारवाई, त्यानंतर अचानक पाकिस्तानसोबत करण्यात आलेली युद्धबंदी आणि भारतीय वायु दलाचे अर्थात एअरफोर्जचे झालेले नुकसान यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. असे असताना देशाचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, ऑपरेशन सिंदूरची कारवाई करण्यापूर्वी आम्ही पाकिस्तानला पूर्व कल्पना दिली होती अशी कबुली दिली. त्यावरून काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, लष्करी हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा आहे असा आरोप करत हा अधिकार कोणी दिला असा असा सवालही केला.
तसेच राहुल गांधी पुढे बोलताना सवाल केला की, या हल्ल्याची माहिती देण्याच्या बदल्यात भारतीय वायु दलाची राफेलची किती विमाने गमवावी लागली असा सवालही यावेळी केला.

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांचा एक व्हिडिओही काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्सवर शेअर केला आहे.

दरम्यान, त्यानंतर ऑपरेशन सिंदूरवरील परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची वक्तव्ये “खोट्या पद्धतीने सादर केल्या जात आहेत,” असे परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी म्हटले आहे. त्यांनी “तथ्यांचे पूर्णपणे चुकीचे वर्णन” असा खुलासा केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारने पाकिस्तानला अचूक हल्ल्यांबद्दल आगाऊ माहिती दिल्याचा आरोप केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून असा खुलासा करण्यात आला आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांचा एक व्हिडीओ शेअर करत म्हणाले की, आमच्या हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा होता. परराष्ट्र मंत्री यांनी जाहीरपणे कबूल केले आहे की भारत सरकारने हे केले. त्याला कोणी परवानगी दिली? परिणामी आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली? असा सवालही यावेळी केला.

गुरुवारी डॉ एस जयशंकर यांचा प्रसार माध्यमांशी बोलतानाचा व्हिडिओही राहुल गांधी यांनी शेअर केला. या व्हिडिओ क्लिपमध्ये परराष्ट्र मंत्री असे म्हणाले की, “ऑपरेशनच्या सुरुवातीलाच आम्ही पाकिस्तानला संदेश पाठवला होता की, ‘आम्ही दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला करत आहोत आणि आम्ही लष्करावर हल्ला करत नाही आहोत.’ म्हणून लष्कराकडे या प्रक्रियेत हस्तक्षेप न करण्याचा आणि वेगळे राहण्याचा पर्याय आहे. त्यांनी तो चांगला सल्ला न घेण्याचा पर्याय निवडला.”

राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितले होते की, आम्ही सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता, जो ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतरचा पहिला टप्पा आहे. हे ऑपरेशन सुरू होण्यापूर्वीचे असल्याचे खोटेपणे दाखवले जात आहे. तथ्यांचे हे पूर्णपणे चुकीचे वर्णन केले जात आहे.

यापूर्वी, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने देखील यावर टीका केली होती आणि म्हटले होते की डॉ एस जयशंकर यांनी “असे कोणतेही विधान केलेले नाही” आणि त्याचे “चुकीचे उद्धरण” दिले जात आहे.

हल्ल्यानंतर लगेचच जारी करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्यावतीने जाहिर करण्यात निवेदनात स्पष्ट केले की, काही वेळापूर्वी, भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला, जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखण्यात आले आणि निर्देशित केले गेले.

एकूण, नऊ (९) स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे.

आमच्या कृती केंद्रित, मोजमाप केलेल्या आणि तीव्र स्वरूपाच्या नाहीत. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांच्या निवडीमध्ये आणि अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये भारताने बराच संयम दाखवला आहे.

पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली आहेत, ज्यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत”.

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर एका दिवसानंतर, पाकिस्तानने भारतीय लष्करी आणि नागरी पायाभूत सुविधांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यांचा भारताने यशस्वीरित्या बचाव केला आणि ११ पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिला.

१० मे रोजी दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवण्यास आणि पुढील लष्करी कारवाई थांबवण्यास सहमती दर्शविली.

About Editor

Check Also

अमेरिकेच्या विमानांना हवाई हद्द आणि विमानतळ वापरण्यास स्पेनचा नकार इराण विरोधात लढाऊ विमाने आणि विमानांना तळ म्हणून वापरण्यास केली मनाई

इराणवरील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या अमेरिकी विमानांसाठी स्पेनने आपली हवाई हद्द बंद केली आहे. संयुक्तपणे चालवल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *