२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपामध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या वृत्तांवर आरएसएस प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच भाष्य करत म्हणाले की, संघर्ष होऊ शकतो, परंतु भाजपाशी कोणताही वाद नाही.
सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी “निवडणुकीच्या भाषणबाजीतून बाहेर पडून” मणिपूर संघर्ष प्राधान्याने सोडवण्याची गरज अधोरेखित केल्यानंतर, भाजपा आणि त्यांच्या वैचारिक पालक असलेल्या आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वंयसेवक संघातील मतभेदांबद्दल चर्चा सुरु झाल्या. यावेळी पुढे बोलताना डॉ मोहन भागवत यांनी केवळ भूतकाळातील कामगिरीवर अवलंबून न राहता लक्षणीय काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.
२०२४ मध्ये भागवत यांचे हे विधान अशा वेळी आले होते जेव्हा लोकसभा निवडणुकीदरम्यान संघाने खरोखरच हात आखडता घेतला होता आणि भाजपाला मनापासून पाठिंबा दिला नव्हता याबद्दल चर्चा सुरू होती.
काहींनी त्यांच्या वक्तव्याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा असा लावला. कारण पंतप्रधानांनी अनेक प्रसंगी स्वतःला लोकांचे “प्रधानसेवक” असे संबोधले होते.
डॉ मोहन भागवत म्हणाले की, प्रत्येक सरकारशी आमचा चांगला समन्वय आहे, मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार. परंतु अशा काही व्यवस्था आहेत ज्यात काही अंतर्गत विरोधाभास आहेत. जरी खुर्चीवर बसलेला माणूस आपल्यासाठी १००% असला तरी त्याला ते करावेच लागते आणि अडथळे काय आहेत हे त्याला माहिती असते. तो ते करू शकेल किंवा नसू शकेल. आपल्याला त्याला ते स्वातंत्र्य द्यावे लागेल. कुठेही भांडण नाही,” असे नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढील राष्ट्रीय अध्यक्षाच्या शोधात असलेल्या भाजपाने गेल्या महिन्यात आपल्या ३६ राज्य युनिट्सपैकी २९ युनिट्समध्ये (पंजाबमधील कार्यकारी अध्यक्षाच्या नामांकनासह) संघटनात्मक निवडणुका पूर्ण केल्या, ज्यामुळे नवीन पक्षप्रमुख निवडण्यासाठी आवश्यक असलेला कोरम पूर्ण झाला. तथापि, पक्षाला आतापर्यंत नाव निवडता आलेले नाही.
टीकाकारांचा असा अंदाज आहे की यामध्ये संघाचा सहभाग असू शकतो आणि नावावर एकमत नसल्यामुळे घोषणा होण्यास विलंब होत आहे. संघ प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी अशा अटकळींना खोडून काढत म्हणाले की, जर तसे असते तर भाजपाला आतापर्यंत त्याचा पुढचा अध्यक्ष मिळाला असता.
पुढे बोलताना डॉ मोहन भागवत म्हणाले की, मी अनेक वर्षांपासून संघ चालवत आहे आणि ते सरकार चालवत आहेत. म्हणून, आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो, निर्णय घेऊ शकत नाही. जर आम्ही निर्णय घेत असू तर इतका वेळ लागेल का? आम्ही निर्णय घेत नाही,” असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya