जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “पापाचे भांडे आता भरले आहे” आणि दहशतवाद ताबडतोब उखडून टाकण्याची हिच वेळ असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईचे ठाम समर्थन केले.
दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगामच्या पहिल्या भेटीत फारूख अब्दुल्ला यांनी जोरदार आणि भावनिक भाषणात म्हटले की, २२ एप्रिल रोजी झालेल्या हत्याकांडामागील लोक “नरकात सडतील”. पाकिस्तानस्थित लष्कर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ पर्यटक आणि काश्मिरी पोनी राईड ऑपरेटर सय्यद आदिल शाह यांचा मृत्यू झाला.
शनिवारी फारूख अब्दुल्ला यांनी आदिल शाहच्या कुटुंबाची भेट घेतली, ज्याला निसर्गरम्य बैसरन कुरणात पर्यटकांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करताना गोळी लागली होती.
फारूख अब्दुल्ला पुढे म्हणाले “येथे ज्यांनी आपले प्राण गमावले, मी त्या वधूला सांगू इच्छितो, ज्याचे लग्न फक्त ६ दिवसांपूर्वी झाले होते, त्या मुलाला ज्याने त्याच्या वडिलांना रक्ताने माखलेले पाहिले होते की आम्हीही रडलो. आम्हीही जेवले नाही. असे राक्षस अजूनही आहेत जे मानवतेचा खून करतात. ते स्वतःला मुस्लिम म्हणतात, पण मला वाटते की ते मुस्लिम नाहीत,” असे सांगितले.
पुढे बोलताना फारूख अब्दुल्ला म्हणाले, “मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, सर्वांचा बदला घेतला जाईल… अब घडा भर गया है (पापाचा भांडा आता भरला आहे). आता आपल्याला तो (दहशतवाद) मुळापासून उपटून टाकण्याची गरज आहे. आपण ३५ वर्षांपासून ते पाहत आहोत. पण, ते कधीही जिंकले नाहीत, ते कधीही जिंकणार नाहीत,” असेही सांगितले.
माजी मुख्यमंत्री अनेक पर्यटकांशी संवाद साधताना आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढताना देखील दिसले. अशा हल्ल्यांना घाबरू नका असे आवाहन करत, त्यांनी ट्रिप रद्द होण्याच्या गर्दीत काश्मीर सोडू नका असे आवाहन केले.
नॅशनल काँन्फरन्सचे प्रमुख फारूख अब्दुल्ला म्हणाले की, “जास्तीत जास्त पर्यटकांनी येथे यावे. त्यांनी घाबरू नये. जो डर गया, जो मार गया. दहशतवाद संपवणे महत्वाचे आहे आणि यासाठी पंतप्रधान कोणतीही कारवाई करतील, आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्याची वाट पाहत आहोत,” असे सांगितले.
जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ नेत्यांनी सिंधू जल करार (IWT) पुन्हा विचारात घेण्याबद्दलही सविस्तर भाष्य केले, जो हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून स्थगित केला आहे. हा करार पाकिस्तानच्या ८०% शेती जमिनीसाठी पाणी सुनिश्चित करतो.
फारूख अब्दुल्ला पुढे म्हणाले की, “आम्ही बऱ्याच काळापासून म्हणत आहोत की आपल्याला आयडब्लूटी IWT पुन्हा विचारात घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आपले नुकसान होत आहे. नद्या आपल्या आहेत पण आपण त्रस्त आहोत. मी असे म्हणत नाही की पाणी थांबवावे, परंतु त्यावर आपलाही अधिकार आहे,” असे ते म्हणाले.
President @JKNC_ Dr Farooq Abdullah Sahab along with Honble MLA Pahalgam @altaf_kaloo Sb visited the residence to martyr Adil Hussain at Hapatnard to express condolences and also met various tourists at Pahalgam. pic.twitter.com/CaUSBh8nJN
— Umesh Talashi (@UTalashi) May 3, 2025
करारानुसार, भारताला “पूर्व नद्या” – सतलज, बियास आणि रावी – च्या सर्व पाण्याचा अनिर्बंध वापर होता. दरम्यान, पाकिस्तानला “पश्चिम नद्या” – सिंधू, झेलम आणि चिनाब यांचे पाणी घेण्याची परवानगी होती.
माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला म्हणाले की, करारामुळे भारताला पाकिस्तानच्या परवानगीशिवाय त्यांच्या नद्यांवर कोणतेही प्रकल्प बांधण्यास मनाई होती.
पुढे बोलताना फारूख अब्दुल्ला म्हणाले की, “तुम्हाला वीजेपासून वंचित ठेवले जात नाही का? आमच्याकडे असे नद्या आहेत ज्यातून आम्ही हजारो मेगावॅट वीज निर्माण करू शकतो आणि आम्हाला कधीही वीजेपासून वंचित ठेवता येणार नाही. परंतु आम्ही कोणतेही प्रकल्प बांधू शकत नाही कारण ते (पाकिस्तान) आम्हाला परवानगी देत नाहीत. म्हणून, आम्हाला ते पुन्हा एकदा पहावे लागेल,” असेही सांगितले.
Marathi e-Batmya