राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार राहत असलेले नवी दिल्लीतील बीडी मार्गावरील ब्रम्हपुत्रा या अपार्टमेंट शनिवारी अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली. या आगीचे कारण अद्याप समजले नाही. परंतु आग आटोक्यात आणण्यातसाठी अग्निशामक दलाने प्रयत्न केले.
संसदेपासून अपार्टमेंट साधारणतः २०० मीटर अंतरावर आहे. या आगीत अपार्टमेंट मधील काही फ्लॅटसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
आगीची घटना घडल्यानंतर काही वेळातच अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले.
ब्रम्हपुत्रा अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावरील आग लागली. त्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली आणि मोठा गोंधळ उडाला. मात्र त्यानंतर तात्काळ ही घटना अग्निशमन दलाला कळविण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणली.
संसदेपासून २०० मीटर अंतरावर ही ब्रम्हपुत्रा अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांना प्लॅट देण्यात आलेले आहेत. खासदारांच्या निवासस्थानापैकी एक निवासस्थानही हे आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर करत ते ही याठिकाणी राहत असल्याचे सांगत पोस्टमध्ये म्हणाले की, दिल्लीतील बीडी मार्गावरील ब्रम्हपुत्रा अपार्टमेंट मध्ये मोठी आग लागली. सर्व रहिवासी राज्यसभेचे खासदार आहेत. ही इमारत संसदेपासून २०० मीटर लांब आहे. ३० मिनिटापासून लागली आहे. आग अजूनही आहे. वाढत आहे, वारंवार फोन करूनही अग्निशमन दलाच्या गाड्या अजूनही गायब असल्याची टीका करत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशीरा दाखल झाल्याचा आरोप केला.
Marathi e-Batmya