जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात बदली चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : प्रतिनिधी

जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांची थेट मुख्यमंत्री कार्यालयात बदली करण्यात आली आहे. त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी आणि प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. डिग्गीकर यांच्यासाठी नवीन पद निर्माण करण्यात आले असून त्यांच्यावर विशेष प्रकल्पांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी चार सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जारी केली. भिवंडी-निजामपूर महापालिकेचे आयुक्त योगेश म्हसे-पाटील यांची बदली महाराष्ट्र राज्य सहकार पणन फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेले कौस्तुभ दिवेगांवकर यांची लातूर महापालिकेच्या आयुक्तपदी नेमणूक झाली आहे. तर वनमथी सी. यांची नंदूरबार जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा, गांधी, नेहरूचा हिंदूस्तान लिंचिस्तान बनत चाललाय बांग्लादेशातील हिंदूची हत्या झाल्यानंतर केली केंद्रावर टीका

बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *