ऑपरेशन सिंदूर आणि परिणामी भारत आणि पाकिस्तान दरम्यान लष्करी आणि दहशतवादाच्या विरोधातील कारवायाच्या एका महिन्यानंतर, लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग यांनी शुक्रवारी सांगितले की, पाकिस्तानी सैन्याला मिळणारी ८१ टक्के लष्करी उपकरणे ही चिनीची मूळची आहेत.
लेफ्टनंट जनरल राहुल सिंग हे फिक्कीकडून आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार व्हिडिओमध्ये लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर’ बद्दल मला काही धडे मिळाले पाहिजेत असे मला वाटले. पहिले म्हणजे, एक सीमा, दोन शत्रू. पाकिस्तान आघाडीवर होता. आम्हाला चीनकडून सर्वतोपरी मदत मिळत होती आणि यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर, गेल्या पाच वर्षांत, पाकिस्तानला मिळत असलेल्या लष्करी उपकरणांपैकी ८१ टक्के सर्व चिनी आहेत. त्यामुळे, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नसल्याचे सांगितले.
पुढे बोलताना लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग म्हणाले, चीनने कदाचित पाहिले असेल की ते त्यांच्याकडे असलेल्या इतर विविध शस्त्र प्रणालींविरुद्ध त्यांच्या शस्त्रांची चाचणी घेण्यास सक्षम आहे. ते त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या जिवंत प्रयोगशाळेसारखे असल्याचे सांगितले.
७ मे रोजी सकाळी सुरू झालेला भारत आणि पाकिस्तानमधील चार रात्रीचा लष्करी संघर्ष हा १९७१ च्या युद्धानंतरचा सर्वात मोठा शत्रुत्वाचा उद्रेक होता. ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले आणि ते यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले, असे सरकारने पत्रकार परिषदेत म्हटले होते.
२२ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर चालवण्यात आले होते. या हल्ल्यातील बळींना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पहाटे १.०५ ते १.३० दरम्यान हा हल्ला करण्यात आल्याचे सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
Marathi e-Batmya