मल्लिकार्जून खर्गे यांचा मोदींवर टीकास्त्र, सर्वपक्षिय बैठकीला उपस्थित राहण्यापेक्षा बिहारमध्ये भाषण… पंतप्रधान मोदी यांच्या मोठमोठ्या गप्पा मारता येतात

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, त्या घटनेवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (२८ एप्रिल २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

“देशाचा स्वाभिमान दुखावला जात असताना पंतप्रधान मोदी बिहारमधील निवडणूक रॅलीत भाषण देत होते हे देशाचे दुर्दैव आहे,” असे ते जयपूरमधील ‘संविधान बचाओ’ रॅलीला संबोधित करत म्हणाले.

मल्लिकार्जू खर्गे पुढे बोलताना म्हणाले, “सर्व पक्षांचे नेते सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होते, परंतु पंतप्रधान मोदी त्या बैठकीला आले नाहीत हे दुःखद आहे. बिहार खूप दूर होता का? पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीला येऊन योजना स्पष्ट करायला हवी होती. त्यांना आमच्याकडून काय मदत हवी आहे?” असा खोचक टीकाही यावेळी केली.

पंतप्रधानांवर आणखी हल्लाबोल करताना ते म्हणाले, “मोदींनी महागाई आणि बेरोजगारी दिली. अशा लोकांनी देशाला कमकुवत केले. ५६ इंचाची छाती आकुंचन पावली आहे.” २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की विकासाच्या बाबतीत उत्तर प्रदेशचे गुजरातमध्ये रूपांतर करण्यासाठी ५६ इंचाची छाती लागते.

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेस नेत्यांनी निर्णय घेतला होता की, ते सरकारच्या कृतीला पाठिंबा देतील कारण देश सर्वोच्च आहे. देश सर्वोच्च आहे, मग पक्ष, धर्म. देशासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असेही सांगितले.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, काँग्रेस एकतेबद्दल बोलते पण भाजपा तोडण्याची भाषा करते. या देशात संविधान सर्वोच्च आहे आणि आपली लोकशाही संविधानाच्या अंतर्गत चालते,” असेही यावेळी सांगितले.

तपास यंत्रणांचा गैरवापर आणि काँग्रेस नेत्यांवरील छापे यांच्यावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, जेव्हा जेव्हा काँग्रेस वाढते तेव्हा हे लोक ते दाबण्याचा प्रयत्न करतात. आपण दबले जाणारे नाही असे सांगत भाजपा नेते सर्वांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु लोकांवर “खोटे” खटले दाखल करून ते लोकशाही कमकुवत करू शकत नाहीत असा आरोपही यावेळी केला.

About Editor

Check Also

जयराम रमेश यांची पंतप्रधान मोदींवर टीका, इराणवरील हल्ल्याचा निषेध करण्यातही अपयशी भारतीय सभ्यतेचा अपमान करण्यात मात्र पुढाकार

काँग्रेसने शनिवारी (२१ मार्च, २०२६) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. गेल्या तीन आठवड्यांपासून अमेरिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *