नरेंद्र मोदी सरकार लोकसभेत मतदारसंघांची पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षणाशी संबंधित नवीन घटनादुरुस्ती विधेयक मांडण्याच्या तयारीत असताना, त्याविरोधात आपली रणनीती निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीने शनिवारी एक बैठक घेतली.
‘इंडिया’ आघाडीतील ११ पक्षांच्या दोन तास चाललेल्या बैठकीनंतर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, इंडिया आघाडी या विधेयकाला विरोध करेल. त्यांनी पंतप्रधान मोदींवर भारतात “चीनसारखी व्यवस्था” निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे यांनी असा आरोप केला की, मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे हे विधेयक म्हणजे अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना देशाच्या सत्तेच्या संरचनेत त्यांचा योग्य वाटा मिळू नये, यासाठी सरकारकडून सुरू असलेला एक प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही यावेळी केला.
मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, “आज आमच्या ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांनी या विधेयकाबाबत बैठक घेतली, जे आमच्या लोकशाहीवरच एक हल्ला आहे. त्यांना सर्व सत्ता स्वतःच्या हातात ठेवायची आहे, म्हणूनच ते जागांची संख्या वाढवत आहेत. हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या जागांवरही अन्याय करणारे आहे.”
या बैठकीत काँग्रेसव्यतिरिक्त समाजवादी पार्टी (SP), तृणमूल काँग्रेस (TMC), झारखंड मुक्ती मोर्चा (JMM), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP), नॅशनल कॉन्फरन्स (NC), इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), राष्ट्रीय जनता दल (RJD), शिवसेना (UBT) आणि अपक्ष खासदार कपिल सिबल उपस्थित होते. ‘इंडिया’ आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP-SP) मात्र या बैठकीला उपस्थित राहिली नाही; विशेष म्हणजे, आदल्या दिवशीच त्यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले.
आज INDIA Alliance के सभी दलों के नेताओं ने मिलकर तय किया है कि मोदी सरकार द्वारा लाया जा रहा संविधान संशोधन Bill लोकतंत्र के लिए बहुत बड़ा खतरा है। हम इसका विरोध करेंगे।
इसके पीछे कई महत्वपूर्ण कारण हैं।
1. पहले इनका नारा ‘400 पार’ था। देश की जनता ने उसे विफल कर दिया। अब 850 सीटों तक लोकसभा का विस्तार करके ये हमेशा के लिए सत्ता अपने हाथों में रखना चाहते हैं।
इनका उद्देश्य लोकतंत्र को मजबूत करना नहीं, बल्कि पूरी सत्ता अपने हाथों में केंद्रित करना है।
2. इस Bill में SC/ST यानी अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के हितों का ध्यान नहीं रखा गया है।
संविधान का Article 330 कहता है कि SC/ST के लिए उनकी जनसंख्या के अनुपात में सीटें आरक्षित होनी चाहिए।
जब नया Census होने वाला है, तो उसके आंकड़ों का इंतज़ार क्यों नहीं किया जा रहा है? Latest Census के अनुसार SC/ST की जनसंख्या के अनुपात में उनकी सीटें निर्धारित होनी चाहिए।
हमारा सवाल है कि सरकार अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति को उनकी आबादी के अनुसार उनका उचित Share देने से क्यों बच रही है?
3. जिस चुनाव आयोग पर 10 करोड़ से ज्यादा लोगों के नाम मतदाता सूची से हटाने को लेकर गंभीर सवाल उठ रहे हैं, उसी चुनाव आयोग को परिसीमन की जिम्मेदारी सौंपी जा रही है। यह हमें स्वीकार नहीं है।
Chief Election Commissioner ज्ञानेश कुमार की निष्पक्षता पर पहले से ही गंभीर सवाल हैं। अगर उन्हीं की देखरेख में Delimitation होगा, तो उसकी निष्पक्षता की क्या Guarantee है?
किस सीट को General बनाना है, किस सीट को Reserved बनाना है, कहां महिलाओं के लिए सीट आरक्षित करनी है, इन सभी महत्वपूर्ण फैसलों में चुनाव आयोग की भूमिका होगी।
जब ‘Vote Chori’ को लेकर ही इतने गंभीर आरोप हैं, तो ऐसे में Delimitation की निष्पक्षता पर सवाल उठना स्वाभाविक है।
4. असम और जम्मू-कश्मीर में किस ढंग से Delimitation किया गया, इसके उदाहरण हमारे सामने हैं।
Geography और Population के आधार पर निर्वाचन क्षेत्रों की सीमाओं में किस तरह बदलाव किया गया, General और Reserved सीटों का स्वरूप कैसे बदला गया, इसके राजनीतिक परिणाम भी हमने देखे हैं।
हमें आशंका है कि पूरे देश में इसी तरह का परिसीमन करके BJP अपने राजनीतिक हितों को साधना चाहती है।
5. अप्रैल में जब सरकार यह Bill लेकर आई थी, तब उसे Two-third Majority नहीं मिली और Bill विफल हो गया।
अब TMC, NCP, शिवसेना और अन्य राजनीतिक दलों को तोड़कर अपने Numbers जुटाने की कोशिश की जा रही है। जब सरकार को लग रहा है कि शायद उसके पास पर्याप्त संख्या हो सकती है, तब वह दोबारा यह Bill लेकर आ रही है।
6. एक बार पूरी सत्ता इनके हाथों में चली गई, तो ये संविधान में अपनी इच्छानुसार बदलाव करने के लिए इस बहुमत का इस्तेमाल कर सकते हैं।
हम नहीं चाहते कि भारत की संसद भी चीन की तरह ऐसी संस्था बन जाए, जहां सरकार के इशारे पर सभी हाथ उठाकर हर प्रस्ताव को मंजूरी दे दें।
हमें आशंका है कि इसके जरिए RSS-BJP हमेशा के लिए सत्ता अपने हाथों में रखना चाहती है और संविधान की जगह मनुस्मृति की विचारधारा लागू करना चाहती है।
इसीलिए हम सभी ने मिलकर इस संविधान संशोधन Bill का विरोध करने का निर्णय लिया है।
यह न SC/ST के हित में है, न देश के हित में और न ही लोकतंत्र के हित में है।
यह Amendment लोकतंत्र को जिंदा रखने के लिए नहीं, बल्कि लोकतंत्र को खत्म करने के लिए लाया जा रहा है।
— Mallikarjun Kharge (@kharge) November 28, 2026
काँग्रेसने नवी दिल्लीतील मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित या बैठकीसाठी ‘इंडिया’ आघाडीत नसलेल्या आणि एनडीए (NDA) मध्येही नसलेल्या आम आदमी पार्टी (AAP), द्रमुक (DMK) आणि बिजू जनता दल (BJD) सारख्या पक्षांनाही निमंत्रित केले होते, परंतु ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. तत्पूर्वी, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी आपल्या पक्षाचे नेते आणि खासदारांसोबत चर्चा केल्यानंतर, या विधेयकाला अधिकृतपणे पाठिंबा जाहीर केला होता.
मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले की, “कलम ३३० अंतर्गत अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) साठीच्या जागा वाढायला हव्यात, परंतु या विधेयकात तसा कोणताही उल्लेख नाही. २०२६ च्या जनगणनेबाबत त्यांनी आम्हाला काहीही सांगितलेले नाही. मात्र, जर त्यांनी ताज्या जनगणनेच्या आधारे घोषणा केली, तर SC/ST प्रवर्गाला अधिक जागा मिळायला हव्यात. परंतु, त्यांना असे वाटत नाही की SC/ST प्रवर्गाला त्यांचा हक्क मिळावा,” असेही यावेळी म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेवरून मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले: “ज्या व्यक्तीने मतदार यादीतून १० कोटींहून अधिक लोकांची नावे काढून टाकली, त्याच व्यक्तीकडे आता मतदारसंघांच्या पुनर्रचनेची (delimitation) जबाबदारी दिली जात आहे. हे आम्हाला मान्य नाही. यामुळे वाद अधिकच चिघळेल.”
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले: “आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये त्यांनी ज्या प्रकारे मतदारसंघांची पुनर्रचना केली, ते आपण पाहिलेच आहे. ते आपापल्या सोयीनुसार भौगोलिक किंवा लोकसंख्येच्या आधारावर जागांमध्ये बदल करतात. गेल्या वेळी त्यांचा डाव फसला, म्हणून आता त्यांनी विरोधी पक्षांना फोडण्यास सुरुवात केली.”
मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, या विधेयकाला “कोण पाठिंबा देईल, हे स्पष्ट नाही. परंतु सरकार हे विधेयक आणत आहे, ज्यामुळे देशाचे मोठे नुकसान होईल. जर त्यांना बहुमत मिळाले, तर ते राज्यघटना बदलण्याचाही प्रयत्न करू शकतात. आम्ही याला विरोध करू. मोदीजी चीनसारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकशाही संपवून टाकतील आणि ‘मनुस्मृती’ लागू करतील.”
मल्लिकार्जून खर्गे शेवटी म्हणाले की, आम्ही या विधेयकाला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विधेयक SC/ST समुदायांच्या हिताचे नाही आणि आपल्या लोकशाहीसाठी एक धोका असल्याची भीतीही यावेळी व्यक्त केली.
Marathi e-Batmya