पंतप्रधान मोदी यांच्याकडून लाल किल्ल्यावरून पुन्हा एकदा ……. ५०-६० वर्षापूर्वी चीफ कंडक्टर बनविण्याची योजना फाईलीतच, लाखो स्वयंसेवकांनी स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिले

स्वातंत्र्य दिना निमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमी प्रमाणे दोन-चार घटनांचा संदर्भ आणि त्याची माहितीच बदलून टाकली. विशेष म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या नागरिकां त्यांचे श्रेय देण्याऐवजी ज्या संघटना आणि त्या संघटनांच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य चळवळीपासून लाब राहण्यात धन्यता मानली. त्यांनाच स्वांतत्र्य चळवळीचे श्रेय देत भारताचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी यांनी सांगण्याचा प्रयत्न आज स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधत केला. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सलग १२ वर्षे राहुनही देशाला चुकीची माहिती देणारे पंतप्रधान म्हणून नोंद होईल की काय अशी शंका आता निर्माण होत आहे.

त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी सध्या जगात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरम्यात येत असलेल्या सेमी चीफ कंडक्टरचा उल्लेख केला. त्यावरून पंतप्रधान मोदी जी माहिती लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना दिली. त्यामुळे तर आश्चर्याचा धक्का बसण्याचेच बाकी राहिले. पंतप्रधान मोदी यांमी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, ५०-६० वर्षापूर्वी देशात सेमिकंडक्टर बनविण्याच्या तयारी सुरु झाली होती. पण ती मागील इतक्या वर्षात फाईतच फिरत राहिली अशी धक्कादायक माहिती दिली.

पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर लावण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफवर आणि ऑपरेशन सिंदूर प्रकरणी वारंवार श्रेय जाहिररित्या घेतले. त्यावर आज ही कोणताही संदर्भ न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक आणि सुरक्षेशी संबंधित सुधारणांसाठी धोरणात्मक सूचना करताना म्हणाले की, आजही कोणत्याही राष्ट्रासाठी आत्मनिर्भरता (स्वावलंबन) हाच आदर्श आहे, तर त्याच वेळी देशाची लोकसंख्याशास्त्रीय रचना बदलण्याच्या कटाचा इशारा देत पुढे म्हणाले की, स्वदेशीचा वापर करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुधारणांच्या घोषणांनी भरलेले होते,पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, स्वावलंबन केवळ आयात-निर्यात, रुपये, पौंड किंवा डॉलर्सपुरते मर्यादित नाही तर ते आपल्या स्वतःच्या ताकदी आणि क्षमतांशी जोडलेले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या भारतीय वस्तूंवर ५०% कर लादल्या प्रकरणी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने दुसऱ्या देशाचा पाय कमी करण्याचा प्रयत्न करून नव्हे तर स्वतःच्या ताकदीने मोठे व्हायला हवे, “काही देशांचा आर्थिक लोभ स्पष्ट आहे”, असे नाव न घेता अमेरिकेच्या भूमिकेवर भाष्य केले.

तसेच पुढे बोलताना पंतप्रधान मोदी यांनी त्या तीन कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवत शेतकऱ्यांना लक्ष्य केले होते. पण आता अमेरिकेने लादलेल्या टॅरिफवर बोलताना देशाच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींच्या मध्ये मी भिंत म्हणून उभा असल्याचे सांगत शेतकऱ्यांची सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय शस्त्रास्त्रे आणि शस्त्रास्त्र प्रणालींच्या तैनातीपासून सुरुवात करून, पंतप्रधान मोदी म्हणाले की, संरक्षण आणि अर्थव्यवस्थेतील स्वावलंबन हे विकसित भारताचा आधारस्तंभ आहे. यावेळी एक वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी व्यवस्थेच्या आठ वर्षांनंतर दुसऱ्या टप्प्यातील सुधारणा सुरू करण्यासाठी आणि पुढील पिढीतील आर्थिक सुधारणांसाठी उच्च अधिकार असलेले कार्यदल स्थापन करणार असल्याचे सांगत देशातील नागरिकांना दिवाळीची भेट मिळेल असे सांगितले.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, दुसऱ्या टप्प्यातील जीएसटी सुधारणांवरील कार्यदल जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये मोठी सवलत देईल. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, सरकार ₹१ लाख कोटींचा नवीन निधी तयार करेल (हि घोषणा २०२१ ला लाल किल्ल्यावरील भाषणावेळीच दिली होती), प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना, जी खाजगी क्षेत्रात पहिल्यांदाच येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ₹१५,००० एकरकमी अनुदान आणि रोजगार निर्मितीसाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन देईल असे सांगत मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगांसाठी (एमएसएमई) अनुपालन खर्च कमी करणे आणि रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्राला चालना देण्यासाठी मनमानी कायदेशीर कारवाईच्या भीतीपासून मुक्तता मिळवणे हे देखील सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, भारत २०२५ च्या अखेरीस ‘मेड-इन-इंडिया’ सेमीकंडक्टर चिप्स लाँच करेल, अशी घोषणा करत जागतिक स्पर्धात्मकतेसाठी त्यांनी एआय, सायबर सुरक्षा, डीप-टेक आणि ऑपरेटिंग सिस्टममधील नवोपक्रमांवर भर दिला. सहा सेमीकंडक्टर युनिट्स आधीच जमिनीवर आहेत आणि चार नवीन युनिट्सना हिरवा कंदील देण्यात आला असल्याचेही यावेळी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान तैनात केलेल्या मेड-इन-इंडिया शस्त्रे आणि शस्त्रास्त्र प्रणालीचे कौतुक करताना, पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की, भारत २०३५ पर्यंत “सुदर्शन चक्र” शील्ड वेपन सिस्टम तयार करेल जे केवळ लष्करी आणि नागरी क्षेत्रांचे संरक्षण करणार नाही तर अचूक, लक्ष्यित पद्धतीने प्रत्युत्तर देईल, ज्यामुळे भारताची धोरणात्मक स्वायत्ततेची वचनबद्धता अधोरेखित होईल. तरुणांनी भारतीय लढाऊ विमानांच्या हृदयात मेड इन-इंडिया जेट इंजिन असेल याची खात्री करण्यासाठी काम करावे असेही यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदींनी विशेषतः छत्तीसगडमधील नक्षलविरोधी कारवायांचा विशेष उल्लेख केला की, दहशतवादी कॉरिडॉर ग्रीन कॉरिडॉर बनले आहेत. तथापि, त्यांनी देशाचे लोकसंख्याशास्त्रीय स्वरूप बदलण्याचा कट रचल्याचा इशारा दिला, विशेषतः सीमावर्ती भागात.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या मुद्द्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा आढावा घेण्यासाठी उच्चाधिकार असलेल्या लोकसंख्याशास्त्रीय मोहिमेची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करत पुढे म्हणाले की, मी देशाला एका चिंतेबद्दल, आव्हानाबद्दल सावध करू इच्छितो. एका विचारपूर्वक केलेल्या कटाच्या अंतर्गत, देशाची लोकसंख्याशास्त्र बदलली जात आहे, एका नवीन संकटाची बीजे पेरली जात आहेत. घुसखोर माझ्या देशातील तरुणांचे जीवनमान हिरावून घेत आहेत. घुसखोर माझ्या देशातील बहिणी आणि मुलींना लक्ष्य करत आहेत. हे सहन केले जाणार नाही. हे घुसखोर निष्पाप आदिवासींना दिशाभूल करतात आणि त्यांची जमीन बळकावतात. देश हे सहन करणार नाही. सीमावर्ती भागात लोकसंख्याशास्त्रीय बदल झाल्यास राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो… कोणताही देश ते घुसखोरांच्या हाती देऊ शकत नाही… म्हणून, मी असे म्हणू इच्छितो की आम्ही ‘उच्च-शक्ती लोकसंख्याशास्त्रीय मोहिमे’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत देशात एनआरसी योजना लागू करण्याचे अप्रत्यक्ष जाहिर केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या अर्थसंकल्पातील मोठा भाग इतर देशांकडून इंधन आणि ऊर्जा खरेदी करण्यावर केंद्रित असल्याचे नमूद करून सांगितले की, २०४७ पर्यंत भारत आपल्या १० अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे अणुऊर्जेची क्षमता १० पट वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवेल आणि राष्ट्रीय खोल पाण्याचा शोध मोहीम भारताच्या खोल पाण्यातील ऊर्जा संसाधनांचा वापर करण्याचा प्रयत्न करेल अशी घोषणाही करत जलविद्युत आणि सौरऊर्जेसह पर्यायी ऊर्जा मार्गांचाही शोध घेतला जाणार असल्याचे सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय गौण खनिजे मोहिमेच्या शुभारंभासह, अशा खनिजे सापडतील अशा १,२०० स्थळांचा शोध घेण्यासाठी महत्त्वाच्या खनिजांमध्ये स्वावलंबनाचाही उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ही भाजपा आणि संघ परिवाराची वैचारिक मातृभूमी आहे, या संघटनेने शतक पूर्ण केल्याबद्दल त्याचे कौतुक केले. तसेच भारतीय इतिहासातील एक सुवर्ण पान म्हटले, जे सेवेसाठी समर्पित आहे, कदाचित जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था. असल्याचे सांगत स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात कोणत्याही पंतप्रधानांनी हे पहिल्यांदाच केले आहे. भाजपा आणि त्यांच्या वैचारिक पालक संघटनेत पुढील भाजपा अध्यक्षांबाबत मतभेद असल्याच्या वृत्तांचा संदर्भ देत हे वक्तव्य केले.

स्वतंत्र भारताच्या कोणत्याही पंतप्रधानाने आतापर्यंतचे हे सर्वात मोठे भाषण केले आणि गेल्या वर्षीच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनापासून पंतप्रधान मोदी यांचा ९८ मिनिटांचा विक्रम मोडून १०३ मिनिटे भाषण केले.

पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा विक्रमही मागे टाकला आणि लाल किल्ल्यावरून १२ भाषणे देणारे दुसरे पंतप्रधान बनले, जवाहरलाल नेहरूंनंतर सलग १७ स्वातंत्र्यदिनी भाषणे देणारे दुसरे पंतप्रधान बनले.

About Editor

Check Also

केरळमधील जनतेसाठी भाजपा-एनडीएकडून ओनम आणि ख्रिसमससाठी दोन सिलिंडर मोफत एनडीएच्या जाहिरनामा आज जाहिर

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय टेनिस दिग्गज लिएंडर पेस यांनी मंगळवारी (३१ मार्च, २०२६) भाजपमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *