विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांचे वर्णन “देशातील सर्वात मोठ्या नेत्यांपैकी एक” असे केले. तसेच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर “राष्ट्रहितासाठी योग्य निर्णय” घेण्याचा विश्वास असल्याचे सांगितले. चंद्राबाबू नायडू, ज्यांचा तेलुगू देसम पक्ष एनडीएचा प्रमुख सहयोगी आहे, त्यांनी आधीच सत्ताधारी गटाचे उमेदवार महाराष्ट्राचे …
Read More »डॉ एस जयशंकर यांची टीका, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा धोरण राबविणारा दुसरा कोणी नाही भारतावर टॅरिफ आकारणीवरून आणि परराष्ट्र धोरणावरून केली टीका
सध्याच्या राष्ट्राध्यक्षांएवढे सार्वजनिकरित्या परराष्ट्र धोरण राबविणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कधीच नव्हता अशी टीका परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वर्णन केले. दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले, हे स्वतःच एक पाऊल आहे जे केवळ भारतापुरते मर्यादित नाही… राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा जगाशी वागण्याचा मार्ग, अगदी त्यांच्या …
Read More »इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी म्हणाले, …पण लोकशाहीच आव्हानाखाली एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार
सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची उमेदवारी भाजपाने जाहिर केल्यानंतर विरोधी पक्ष अर्थात इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शनिवारी (२३ ऑगस्ट २०२५) देशात “लोकशाहीमध्ये कमतरता” असल्याचे सांगत संविधान “तणावाखाली” असल्याचे मत व्यक्त करत संविधानाचे रक्षण आणि संरक्षण करण्याचे वचन दिले. एका वृतत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत न्यायमूर्ती बी …
Read More »श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचा अटक खाजगी परदेश दौऱ्यासाठी राष्ट्रीय निधीचा वापर
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती आणि सहा वेळा पंतप्रधान राहिलेले रानिल विक्रमसिंघे यांना शुक्रवारी (२२ ऑगस्ट २०२५) त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात खाजगी परदेश दौऱ्यासाठी देशाच्या निधीचा वापर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. “सप्टेंबर २०२३ मध्ये लंडनला झालेल्या भेटीबाबत रानिल विक्रमसिंघे यांची शुक्रवारी सकाळी (२२ ऑगस्ट २०२५) गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) चौकशी केल्यानंतर लगेचच …
Read More »मंत्र्यावर गंभीर आरोप, पदावरून काढणारः अमित शाह यांनी मांडले विधेयक संघराज्य तत्वाला तडे जाणार असल्याचा आरोप
लोकसभेने रिअल मनी गेमिंग कंपन्यांना बंदी घालणारा कायदा मंजूर केला. या कायद्याच्या महत्त्वाबद्दल युक्तिवाद करताना, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखित केले की रिअल मनी गेमिंगचे व्यसन हे अनेक आत्महत्या आणि सामाजिक दुष्कृत्यांचे कारण आहे. त्यांनी अधोरेखित केले की ऑनलाइन गेमिंगच्या या विभागामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, निवडणूक आयोग आणि भाजपामध्ये मतचोरीचे संबध मतदार अधिकार यात्रा नवादा येथे पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांचा आरोप
‘मतदार अधिकार यात्रे’च्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर (ईसीआय) हल्ला सुरूच ठेवला आणि निवडणूक आयोगावर भारतीय जनता पक्ष (भाजपा) सोबत संबध- भागीदारी असल्याचा आरोप केला. नवादा येथील भगतसिंग चौकात एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा आणि निवडणूक आयोग यांच्यात …
Read More »चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारताच्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटले सीमेवरील तणावावर एकमेकांना विश्वास देण्याचा आणि वातावरण निवळण्याचा शब्द
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या बैठकीत सांगितले की, भारत-चीन संबंधांमध्ये प्रगतीसाठी सीमेवर शांतता आवश्यक आहे. दोन्ही देशांनी कठीण काळातून अनुभवले आहे हे लक्षात घेऊन, एस एस जयशंकर यांनी पुढे जाण्यासाठी स्पष्ट आणि सहकार्यात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले. एस जयशंकर वांग यी यांच्याशी …
Read More »पंतप्रधान मोदी यांची माहिती, व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प-पुतीन चर्चेची माहिती दिली फोन करून चर्चेची माहिती दिल्याचे एक्सवर ट्विट करत दिली माहित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलास्का येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या अलिकडच्या भेटीबद्दल फोन करून माहिती दिल्याबद्दल आभार मानले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भातील माहिती एक्सवर ट्विट करत देताना म्हणाले की, “माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष पुतिन, त्यांच्या फोन कॉलबद्दल आणि अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी …
Read More »मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय
विरोधी इंडिया गट मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणणार असल्याचे काँग्रेसचे नेते गौरव गोगई यांनी सांगितले. सोमवारी (१८ ऑगस्ट २०२५) इंडिया आघाडीतील नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मोठ्या प्रमाणात मतदार चोरीचा आणि आयोग सत्ताधारी पक्षाच्या बाजूने काम करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आणि निवडणूक आयोगाच्या आरोपांना …
Read More »चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भेटणार पंतप्रधान मोदी यांना भारत-चीन सीमा प्रश्नी चर्चेसाठी वांग यी भारत भेटीवर येणार
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १८ ते २० ऑगस्ट दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असतील आणि त्यादरम्यान ते सीमा प्रश्नावर उच्चस्तरीय चर्चा करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, वांग यी सोमवार, १८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत पोहोचतील आणि त्याच दिवशी संध्याकाळी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्र मंत्री …
Read More »
Marathi e-Batmya