दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराज येथील गंगा नंदीत डुबकी लगावली. मात्र त्याचवेळी अवैधरित्या अमेरिकेत घुसखोरी कऱणाऱ्या १०४ भारतीयांना अमेरिकी प्रशासनाने काल अमृतसर येथे हातापायात बेड्या घालून एखाद्या आरोपीप्रमाणे कालच आणून सोडले. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काल दिवसभरात कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र आज त्याचे पडसाद संसदेत उमटले. त्या गोष्टीचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आणीबाणिच्या काळात काँग्रेसच्या सरकारने भारतीय नेत्यांना बेड्या घातल्या होत्या अशी आठवण करून देत काँग्रेसवर टीका केली.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, एनडीए सरकारचे धोरण हे तुष्टीकरणाचे नाही तर समाधानाचे आहे. तसेच सरकारचे ब्रीदवाक्य असल्याचेही यावेळी सांगत आमचा कारभार सबका साथ, सबका विकास यावर आधारित आहे. आदिवासी आणि मागासवर्गीय खासदारांना न्याय देण्यासाठी आम्ही एससी/एसटी कायदा सशक्त केल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजच्या तरुणांना त्यांच्या पालकांनी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे जाणून घेतले पाहिजे. काँग्रेसचा काळ हा परवाना राज अशीच ओळख होती. लोकांना लग्नात साखर देण्यासाठी, स्कूटर, कार घेण्यासाठी परवाना घ्यावा लागला. हे परवाने मिळवण्यासाठीही लाच द्यावी लागली. त्यांनी भारताचा विकास दर कमी केला आणि त्याला हिंदू विकास दर असे संबोधले गेले. संपूर्ण समाजाचा किती अपमान अशी टीकाही यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या काळात भारताचा विकास कसा झाला हे सांगताना त्यांनी त्याला ‘भारत विकास दर’ असे सांगत सर्व सदस्यांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन करून भारताच्या विकासात अडथळा आणू नये असे आवाहन करत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसकडून ‘सबका साथ, सबका विकास’ची अपेक्षा करणे ही मोठी चूक ठरेल कारण काँग्रेसचे प्राधान्य ‘कुटुंब प्रथम’ आहे. काँग्रेस सरकारने बी आर आंबेडकरांना भारतरत्न दिला नसला तरी आज त्यांना ‘जय भिम’ म्हणायला भाग पाडले आहे, अशी खोचक टीकाही यावेळी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसने ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला नाही, कारण त्यांच्या पक्षाच्या तुष्टीकरणाच्या धोरणाच्या विरोधात होते, प्रथम कुटुंबः आरएसमध्ये असे स्पष्ट करत लोककल्याणासाठी संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, देश प्रथम हा भाजपाचा प्राधान्यक्रम आहे, लोकांनी आमच्या विकास मॉडेलला पाठिंबा दिला आहे असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, नवीन संसद भवनात पहिला निर्णय महिला सक्षमीकरणाचा सन्मान करण्याचा होता, गरिबांचे कल्याण आणि वंचितांच्या विकासासाठी प्राधान्य असल्याचेही यावेळी सांगत इतरांनी दुर्लक्षित केलेल्यांची मोदी पूजा करतात, असे पंतप्रधान राज्यसभेत म्हणाले.
Speaking in the Rajya Sabha. https://t.co/OZKM3x0CEX
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2025
शेवटी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘ संविधान’ हा शब्द काँग्रेसला शोभत नाही, कारण आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस सारख्या नेत्याला हातकडी, बेड्या ठोकल्या होत्या, जवाहरलाल नेहरूंच्या ‘स्टॉप-गॅप’ सरकारने भाषण स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यासाठी घटना दुरुस्ती केली, निवडणुकीची वाट पाहिली नाही, अशी टीकाही यावेळी केली.
Marathi e-Batmya