दिल्लीतील काँलेजच्या प्रिन्सिपॉलने काँलेजच्या सिमेंटच्या भिंतीच शेणानं सारवल्या आता याला काय म्हणायचे शिकलेल्या अधंभक्त की, शिकून सवरून आंधळ्या

२०२५ च्या नव्या वर्षात दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला हरवित सत्ता स्थापन केली. त्यानंतर दिल्लीतील विविध गोष्टींच्या दरात भली मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. त्यावर दिल्लीकरांनी या महागाईचा आणि हिंदू-मुस्लिम धार्मिक दंग्याचा विचारच केला नसल्याचे सांगत भाजपाच्या राज्य कारभारा विरोधात नाराजी व्यक्त केली. मात्र आज सकाळपासून दिल्लीतील लक्ष्मीबाई काँलेजचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या काँलेजच्या महिला प्रन्सिपॉलने चक्क शेणाने (गोबर) काँलेजमधील भिंती सारवताना दिसत आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी या महिला अंधभक्त म्हणायचे की, शिकून सवरूण आंधळ्या झालेल्या म्हणायचे असा सवाल करण्यास सुरुवात केली आहे.

झाले असे की, यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके चांगलेच बसत आहेत. या गर्मी पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाकडून काही ना काही उपाय शोधले जात आहेत. मात्र दिल्लीतील लक्ष्मीबाई कॉलेजमधील या महिला प्रिन्सिपॉलने चक्क काँलेजच्या भिंतीच शेणाने सारवल्या आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी आणखी एका सहाय्यकाला सोबत घेतले आहे. तो सहाय्यकही त्यांच्यासोबत काँलेजच्या भिंती सावरताना दिसून येत आहे.

यासंदर्भात महिला प्रिन्सिपॉल यांना शेणाने भिंती सारवण्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, संशोधनासाठी काँलेजच्या भिंती शेणाने सारवल्या आहेत.

या प्रिन्सिपॉल महिलेच्या कृत्यावरून नेटकऱ्यांनी एकच झोड उठविली आहे. तसेच सिमेंट क्रॉक्रिटने बांधलेल्या काँलेजच्या भिंती कोणी शेणाने सारवत का असा सवाल केला आहे. तसेच महिला प्रिन्सिपॉलच्या या कृतीवर टीकाही करण्यात येत आहे.

दरम्यान, जग इतके पुढे गेलेले असताना सिमेंट कॉक्रिटने बाँधलेल्या भिंतींना शेणाने कोण सारवत असा सवाल उपस्थित करत उन्हापासून त्रास होत असेल तर एसी, कुलर किंवा गेला बाजार फॅनचा वापर आजकाल अनेक जण करत आहेत. मात्र चक्क शेणाने सारवायचं म्हणजे जरा बुद्धीचा अंधभक्तीने वापर केलेला दिसून येत असल्याचेही दिसून येत आहे. काँलेजच्या प्रिन्सिपॉल जर अशा वागू लागल्या तर तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या अशा महिला शिक्षिकांकडून काय शिक्षण घ्यावे असा सवालही यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

आता जीमेलची आयडी- पत्ता बदलता येणार, गुगल कडून नवे फिचर जुना जीमेल कायम ठेवून नवा जीमेल आयडी बनविण्याची परवानगी

तुम्हाला कधी तुमचा जीमेल पत्ता बदलायचा आहे का? कदाचित तुम्ही तुमचे खाते काही वर्षांपूर्वी तयार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *