Breaking News

विनेश फोगट पॅरिसहून भारतात परतताच म्हणाली, लढाई अद्याप संपलेली नाही २०२८ च्या ऑलिंम्पिकमध्ये पुन्हा खेळण्याचे दिले संकेत

कुस्तीपटू विनेश फोगटने शनिवारी १७ ऑगस्ट रोजी भारतात आल्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक २०२४ दरम्यान त्यांनी केलेल्या पाठिंब्याबद्दल संपूर्ण देशाचे आभार मानले. विशेष म्हणजे, फोगट दिल्लीत उतरली आणि तिचे कुस्तीगीर मित्र साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी जोरदार स्वागत केल्याने विनेश फोगट अत्यंत भावूक दिसली.

विनेश फोगट या ऑलिम्पिक वीरते स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांची गर्दी पाहून २९ वर्षीय तरुणीला अश्रू अनावर झाले आणि स्पर्धे दरम्यान सतत पाठिंबा दिल्याबद्दल विनेश फोगटने देशाचे आभार मानले. तसेच विनेश फोगटने सांगितले की, लढाई अद्याप संपली नाही आणि त्यात विजय मिळविण्याच्या प्रयत्नात राहील.

विनेश फोगट म्हणाली की, मी संपूर्ण देशाचे आभार मानू इच्छितो, मी खरोखर भाग्यवान आहे. माझ्या लढ्यात मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. अजूनही हा लढा संपलेला नाही, असेही यावेळी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, फोगटने क्युबाच्या युस्नेलिस गुझमनला पराभूत करून पॅरिस ऑलिंम्पिक गेम्समधील महिलांच्या फ्री स्टाइल ५० किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्याने तिचे नाव खेळाच्या इतिहासाच्या नोंदवले गेले.

ऑलिम्पिकमधील कुस्तीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तथापि, फोगटच्या स्वप्नातील प्रवास थांबला. विनेश फोगट हीला सारा हिल्डब्रॅन्ड विरुद्धच्या अंतिम सामन्याच्या दिवशी सकाळी ५० किलोच्या मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले.

दुर्दैवी घटनेनंतर, तिने IOC (आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती) आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) च्या निर्णयाविरुद्ध कोर्ट ऑफ आर्ब्रिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) मध्ये अपील देखील केले. तथापि, एका आठवड्याच्या सुनावणीनंतर सीएएस CAS ने तिची याचिका फेटाळल्याने तिचे प्रयत्न व्यर्थ ठरले.

विनेश फोगटच्या हृदयद्रावक अपात्रतेनंतर, कुस्तीपटूने तिची आंतरराष्ट्रीय निवृत्तीही जाहीर केली. फोगटने परत येण्यापूर्वी तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या चाहत्यांसह एक लांब नोट लिहिली आणि तिच्या भावना त्यावर व्यक्त केल्या. तिने २०२८ मध्ये एलए ऑलिम्पिकमध्ये पुन्हा भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे संकेत दिले.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, राज्यात पानमांजर, गिधाड, रानम्हैससाठी प्रजनन केंद्र दुर्मिळ वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर

राज्यात दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतींच्या जतन आणि संवर्धनावर भर देण्याचे निर्देश देत पानमांजर (ऑटर), गिधाड, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *