भाजपा उमेदवारांच्या विजयासाठी आले आजारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक दोघेही अॅम्ब्युलन्समधून आले एक जण व्हिल चेअर तर दुसऱ्याला स्ट्रेचरवरून आणले

राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत असताना आज दोन परस्पर विरोधी चित्र पाह्यला मिळाले. त्यातील एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान करता यावे याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसऱ्याबाजूला भाजपाच्या दोन आमदारांनी स्वतःची शाररीक स्थिती आणि आरोग्य चांगले नसतानाही निवडणूकीत आपला मतदार म्हणून अधिकाराचे कर्तव्य पार पाडण्यासाठी भाजपाचे दोन आमदार अॅब्म्युलन्सने विधान भवनात आले.

वाचा

आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडील आमदार मतांच्या तुलनेत भाजपाकडील मतांची संख्या कमी आहे. त्यामुळे आपला कोणताही आमदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी भाजपाने आपल्या सर्वच आमदारांना मतदान करण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे आपले शाररीक आरोग्य चांगले नसतानाही पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्याच्या भाजपा आमदार मुक्त टिळक या खास अॅम्ब्युलन्सने विधानभवनात आल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोघे दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. या दोघांनाही स्वतः उठून बसता येत नाही की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सदृढ व्यक्तीसारखे चालून जाता येत नाही. त्यामुळे एकतर या दोघांना स्ट्रेचर आणि व्हिल चेअरवर बसूनच जाता-येता येते. अशा परिस्थितीतही या दोन्ही आमदारांनी विधानभवनात येऊन आपला मतदानाचा हक्क बजाविला.

वाचा

यावेळी लक्ष्मण जगताप हे अॅम्ब्युलन्सने विधान भवनात आल्यानंतर त्यांच्या स्वागताकरीता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीष महाजन यांच्यासह अनेक आमदार हजर होते. यावेळी जगताप हे अॅम्ब्युलन्सने विधान भवनात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी स्वतः अॅम्ब्युलन्समधून खाली उतरल्यानंतर ते व्हिल चेअरमध्ये बसले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा आमदारांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

तर मुक्ता टिळक या विधान भवनात आल्यानंतर त्यांना उठून बसता येत नसल्याने त्यांना अॅम्ब्युलन्समधून स्ट्रेचरवर तसेच खाली आणण्यात आले आणि त्यांना मतदान करण्यासाठी तसेच स्ट्रेचरून विधान भवनात नेण्यात आले.

हे ही वाचा

About Editor

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचा इशारा, गांधी, नेहरूचा हिंदूस्तान लिंचिस्तान बनत चाललाय बांग्लादेशातील हिंदूची हत्या झाल्यानंतर केली केंद्रावर टीका

बांग्लादेशातील हिंदू समुदायांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर एका हिंदू तरूणाची हत्या झाल्यानंतर जम्मू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *