जागतिक योग दिन, योगाभ्यासाचा… जागतिक योग दिनानिमित्त लेखिका मंजिरी पवार यांचा अभ्यासपूर्ण लेख

नियमित व्यायाम व योग करण्याची सवय जोपासल्यास आपल्याला सुदृढ शरीर व चांगले आरोग्य लाभते. शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी ठराविक योगासने आहेत. ताडासन, शवासन, त्रिकोणासन, अर्धचंद्रासन, व आपणा सर्वांनाच परिचित असणारा सूर्यनमस्कार ही योगासने केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास सकारात्मक बदल झाल्याचे अनुभव कित्येक लोकांनी सांगितले आहेत. योग केल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे व लाभ यांचे महत्त्व राखून जगभरात २१ जून हा दिवस जागतिक योग  दिवस” म्हणून साजरा केला जातो.  इतर दिवसांच्या तुलनेत २१ जून हा दिवस उत्तर गोलार्धात सर्वात लांब  दिवस असतो व योग केल्याने आपले आयुष्य लांबते याच कारणाने संयुक्त संघामार्फत २१ जून या दिवसाची जागतिक योग दिवस म्हणून निवड करण्यात आली.

२०१५ पासून जगभरात योग दिवस साजरा करण्यास प्रारंभ झाला आहे व गेल्या दहा वर्षांपासून या दिवशी सार्वजनिक स्थळांवर सामूहिक योगाभ्यास सत्रे राबवली जातात, सरकारी कार्यालयांमध्ये योगासनांबद्दल  जनजागृती केली जाते तसेच डिजिटल माध्यमांमार्फत योगासनांमुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली जाते, जनतेला योगा बद्दल किती माहिती आहे याची पडताळणी करण्यासाठी आरोग्यावर आधारित प्रश्न तयार करून सर्वेक्षण केले जाते. लहानपणापासूनच मुलांना योगासने करण्याची सवय लागावी म्हणून शाळांमध्ये योग कार्यशाळांचे उपक्रम राबविले जातात. या सर्व उपक्रमांना लोकं आवडीने प्रतिसाद देतात.  योग ही भारताची प्राचीन व अमूल्य देणगी असून याचा उगम सिंधू संस्कृती मध्ये झाला असे मानले जाते. भारतात ओळख मिळालेल्या योग या गीतेचा उल्लेख ऋग्वेद, पतंजली योगसूत्रे व उपनिषदांमध्ये या विद्येचा उल्लेख आढळतो. भारताच्या या पारंपारिक ज्ञानाचा जागतिक स्तरावर प्रसार करणे व जगभरात सर्वांनाच योगासनांमुळे होणाऱ्या फायदांचा लाभ घेता यावा हा जागतिक योग दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

आज जागतिक योग दिवसांच्या उपक्रमाच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आयुष मंत्रालयामार्फत  जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) टप्पा २  यांनी एकत्रितपणे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी विशेष उपक्रम राबवणार आहे. योग ही संकल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश ठेवून ‘योगा फोर वेलनेस, योगा फॉर हार्मनी, योगा फॉर युनिटी अशा विविधतेवर आधारित उपक्रम राबविले जातात. आज जगभरातील कोट्यावधी लोकं योगाभ्यास करतात, विविध योगासनांची महिती घेतात जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी योगाचे शास्त्रीय ज्ञान आत्मसात करून नियमित सराव करण्याचा संकल्प करावा, जेणेकरून सर्व समाज आरोग्यदायी होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल.

योग करण्यासोबत संतुलित आहार व परिपूर्ण झोप सुद्धा महत्त्वाची असते. योग व वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गाव तिथे व्यायाम शाळा आणि वाचनालय ही चळवळ महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात आली आहे. योग ही भारतीय संस्कृतीतील मौल्यवान परंपरा असून ती केवळ भारतात पूर्ती मर्यादित राहिलेले नाही. आज फार जगभरातील कोट्यावधी लोक योगाभ्यास करतात. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांनी योगाचे शास्त्रीय ज्ञान आत्मसात करून नियमित सराव करण्याचा संकल्प करावा जेणेकरून सर्व समाज आरोग्यदायी सशक्त व समृद्ध होईल. योग केल्याने फक्त शारीरिकच नाही तर आपले मानसिक आरोग्य सुद्धा चांगले राहते. नियमित योग केल्याने मनाची एकाग्रता वाढते कारण योग हे शरीर, मन आणि आत्मा यांचे उत्तम संतुलन राखते. योग हेच आरोग्याचे द्वार आणि आरोग्य हिच खरी संपत्ती आहे. कीतीही व्यस्त असलो तरी योग करण्यासाठी दिवसभरात थोडा वेळ देणे गरजेचे असते व आपल्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे ही आवश्यक असते.

आजच्या धावपळीचा जगात चिंता व तणाव हे आपल्या शरीरावर नकारात्मक परिणाम करतात म्हणून सुदृढ व निरोगी आरोग्यासोबत आपल्याला आपले जीवन आनंदाने जगता यावे यासाठी केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय योग दिवसामार्फत केलेला हा संकल्प यशस्वी होताना दिसत आहे.

About Editor

Check Also

सय्यद अब्बास अराघची म्हणाले, नेते शहिद झाले तरी कामं सुरुच ठेवली सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांच्या मृत्यूनंतर सय्यद अब्बस अराघची यांची प्रतिपादन

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी बुधवारी सांगितले की, आपल्या सर्वोच्च सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *