Tag Archives: आशिष शेलार

म्हाडाच्या वांद्रे रिक्लेमेशन, आदर्श नगर येथील इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासासाठी मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता

वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी येथील आदर्श नगर या दोन म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. वांद्रे रिक्लेमेशन आणि आदर्श नगर वरळी येथील म्हाडा अंतर्गत असलेल्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे परवानगी देण्यात …

Read More »

आशिष शेलार यांची ग्वाही, ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत घरांचे स्वप्न पूर्ण होणार वांद्रे येथील पुनर्वसित रहिवाश्यांना करारपत्रे वितरित

विकासकामे करताना मानवी चेहरा जपणे गरजेचे असते. त्यामुळे वांद्रे पूर्व येथे ‘वांद्रे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’ अंतर्गत गौतम नगर येथील अनेक कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे प्रतिपादन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले. वांद्रे पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत पुनर्वसित होत असलेल्या रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांचे करारपत्रे वितरणाचा कार्यक्रम …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, एमपीएससी परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार विधान परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूप लागू करण्याचा निर्णय कायम राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. २०२२ मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर २०२५ पासून तो लागू करण्याचे ठरवण्यात आले. आता तो मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सदस्य प्रवीण दरेकर यांनी …

Read More »

आशिष शेलार यांची घोषणा, आगामी ३६५ दिवसात १२०० कार्यक्रम होणार श्रमिकांच्या कलेला असतो घामाचा सुगंध ! आशिष शेलार यांचे मत

श्रमिकांची कला वृद्धींगत झाली होऊन पुढील पिढीपर्यंत नेली पाहिजे. आज जीपीटीचा जमाना आहे. त्यात कृत्रिम ट्यून मिळते पण सृजनाची ट्यून श्रमिक कलावंतच बनवू शकतो. या श्रमिकांच्या कलेला घामाचा सुगंध असतो, गौरव उद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले. महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल कलांचा श्रमिकांचा दोन …

Read More »

पानिपत येथे “मराठा शौर्य स्मारक” उभारण्याचा शासन निर्णय जारी मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

पानिपतच्या “काला अंब” परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. मंत्री ॲड. शेलार म्हणले की, पानिपतच्या तिसऱ्या लढाईला ३५४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १४ जानेवारी, २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या …

Read More »

आशिष शेलार यांचे आवाहन, लोककला आणि नाटक याबाबत अधिक संशोधन करा भायखळा येथील नाट्य महोत्सवात केली

मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यामध्ये काही दुमत नाही. पण त्यापुर्वी लोककला मधून नाटक या कलाकृतीचे काही संदर्भ सापडत असून त्याबद्दल लेखन आणि चर्चा सुरु आहेत. त्यामुळे याबाबत एक सर्वंकष अभ्यास आणि संशोधन होण्याची गरज आहे. या कामी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य …

Read More »

पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन

सक्षम ‘SAKSHAM-2024-25’ हरित आणि स्वच्छ ऊर्जेद्वारे स्वच्छ वातावरण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या वापरावर भर द्यावा. तसेच कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या पर्यावरण पूरक व्यवस्थेचा वापर करावा. असे आवाहन माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यस्तरीय समन्वयक, महाराष्ट्र पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू …

Read More »

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा पहिला पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गीताला फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरातून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

कवी मनाचे महान योध्दे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने यावर्षीपासून दिला जाणार पहिला “राज्य प्रेरणा गीत पुरस्कार” स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या “अनादी मी अनंत मी.. ” या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन केली. ज्या पध्दतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य …

Read More »

शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जाः आशिष शेलार पॅरिसला महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाचा पॅरिस दौरा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झाले. महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत …

Read More »

रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत बांद्रा येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार …

Read More »