Tag Archives: उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र बदलाची सुरुवात मंत्रालयापासूनः चार दिवसानंतर मंत्रालयात आले पाणी महायुती सरकारला मोठा जनाधार सरकारच्या विरोधात बोलू तर भलतीच कारवाई होईल म्हणून अधिकारी चिडीचूप

राज्यात महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आता महाराष्ट्र बदलणार, विकासाच्या वाटेवर चालणार म्हणून भला मोठा बँनर शपथविधीच्या ठिकाणी लावला. त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्र आता बदल्याशिवाय राहणार नाही, विकासाच्या वाटेवर चालल्याशिवाय राहणार नाही …

Read More »

नवी मुंबईतील साडेबारा टक्के योजनेतील भूखंडधारकांना दिलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधीमंडळात घोषणा

नवी मुंबईमध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत वितरीत करण्यात आलेल्या भूखंडांवरील विकास तसेच पुनर्विकासाला चालना मिळण्यासाठी इमारतीच्या अनुज्ञेय उंचीमधून स्टिल्ट पार्कीगची उंची वगळण्यात आली आहे. या तरतुदीचा समावेश आता एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये (युडीसीपीआर) तातडीने लागू करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी …

Read More »

मुंबईतील फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी डीसीपीआरमध्ये स्वतंत्र तरतूद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळात घोषणा

मुंबईतील सांताक्रूझ, पार्ले व कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बधांमुळे बाधित इमारतींच्या पुनर्विकासास चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. यामुळे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य होणार असल्याची …

Read More »

अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड विरोधी पक्षनेते पदावर मुख्यमंत्री म्हणाले...

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (बुधवार) शेवटचा दिवस आहे. आज अधिवेशनाचे सूप वाजत आहे. मागील ३ मार्चपासून हे अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन अनेक कारणांमुळे गाजले आहे. सामान्य लोकांचे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा अन्य विषयामुळे… अन्य कारणामुळे हे अधिवेशन गाजले. दरम्यान, आज विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) अण्णा दादू बनसोडे यांची …

Read More »

विधानसभेत भास्कर जाधव यांचा हल्ला बोल, तर पत्र मागे घेतो… विरोधी पक्षनेता पदी निवड का नाही ?

विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अण्णा बनसोडे यांची निवड झाली. यावेळी अभिनंदनचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात आल्यानंतर विरोधकांकडून भास्कर जाधव बोलताना म्हणाले की, अधिवेशन संपत आले. आज शेवटचा दिवस आहे. उपाध्यक्ष पदाची निवड झाली, मात्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड का नाही झाली? असा सवाल उपस्थित केला. विधानसभेच्या विरोधी …

Read More »

कालच्या राड्यानंतर स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा याचं आणखी एक नवं गीत शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलं

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारीत ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी आखोंपे चष्मा हे गाणं काल स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी रिलिज केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संबधित रेकॉर्डिंग स्टुडिओवर हल्ला करत मोठ्या प्रमाणावर नासधुस आणि तोडफोड केली. या राड्यानंतर कुणाल कामरा यांनी आणखी एक …

Read More »

एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज’ पुरस्कार, विधानसभेत अभिंदनाचा प्रस्ताव सर्वसामान्यांचे दुःख दूर करणं हाच माझा धर्म

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदन परस्पर मांडला. त्याला उपमुख्यमंत्री शिंदे उत्तर देत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही. मला आणि माझ्या …

Read More »

आता अजित पवार यांनीच केलं स्पष्ट, लाडक्या बहिणींचा लाभ या महिलांना मिळणार हप्ताही वाढीव देणार असल्याची दिली माहिती

मागील काही दिवसांपासून महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर जाहिर केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या योजनेतून अनेक महिलांना बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त पुढे येत होते. तसेच अनेक महिलांना या योजनेतून कमी करणार असल्याची चर्चाही वेळोवेळी रंगत होती. इतकेच नव्हे तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा वाढीव हप्ताही देणार असल्याचे चर्चा यावेळी सुरु झाली होती. …

Read More »

अजित पवार यांची शेतकऱ्यांना गोड बातमी, वीस टक्के निर्यात शुल्क रद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शाह, कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचे मानले आभार

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क दि. १ एप्रिल २०२५ पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल,… प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का ? राज्यात कायदा सुव्यवस्थेची बिकट परिस्थिती, महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा व सुरक्षा मिळवा अशी फडणवीस सरकारची योजना असून महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सुरक्षा देण्यात आली असताना तो पळून जातो. कोरटकरचे, आयपीएस अधिकारी व गृहमंत्री यांच्याशी जवळचे हितसंबंध होते, त्याला पळून जाण्यात पोलिसांचीच फूस असावी असा संशय व्यक्त करून कोरटकर पळून जात असताना सरकार काय …

Read More »