Breaking News

Tag Archives: भाजपा

नाना पटोले यांची टीका, मोदींची गॅरंटी … गुन्हेगारीत २ ऱ्या क्रमांकावर ‘लौकिक’

कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्र व मुंबईचा आजवर मोठा नावलौकिक होता, याला भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कलंक लावला आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागाने (NCRB) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महिला अत्याचार, खूनासारख्या गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर महिलांसाठी देशात सर्वात सुरक्षित असलेले मुंबई शहर आता महिला अत्याचारांमध्येही दुसऱ्या क्रमांकावर आहे. …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नावातच एकनाथ असल्याने सगळ्यांना एकत्र आणतोय…

राज्याच्या राजकारणात भाजपाप्रणित सरकारचे प्रतिनिधित्व शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार हे ही सहभागी झाले. त्यामुळे तीन पक्षांचे नेते एकत्रित आल्याने बीडच्या राजकारणातील मुंडे बंधु-भगिनी एकाच मंचावर पहिल्यांद्याच उपस्थित राहिले असल्याचे बीडमधील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच …

Read More »

चार राज्यातील निवडणूकांमध्ये काँग्रेस आणि भाजपाच्या मतांची टक्केवारी किती? जाणून घ्या कोणत्या कारणामुळे भाजपाचा मतदार वाढतोय? तर काँग्रेसचा का घटतोय

लोकसभा निवडणूकांना आता तसे पाह्यला गेले तर तीन ते चार महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र लोकसभेची निवडणूक आचारसहिंता लागू होण्यापूर्वीच देशातील ईशान्य भारतातील मिझोरम, दक्षिण भारतातील तेलंगणा, आणि उत्तर भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यातील विधानसभांचा कार्यकाल संपत येतो. त्यामुळे या राज्यातील निवडणूका घेणे राज्यघटनेतील तरतूदीनुसार केंद्रीय …

Read More »

नाना पटोले यांचा विश्वास,… निकालांचा परिणाम होणार नाही, इंडिया आघाडी मजबूत

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे तर दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपाच्या धर्मांध अजेंड्याला …

Read More »

“हात” ची जागा “कमळ” ला, मात्र निकालाबाबत राहुल गांधी यांचे वक्तव्य खरे ठरले

लोकसभा निवडणूकीची रंगीत तालिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. विशेष म्हणजे या चारही राज्यातील निवडणूक प्रचारात राजस्थान, छत्तीसगड वगळता बाकीच्या दोन राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेत रोष असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होती. तीन महिन्यांनी होत असलेल्या लोकसभा …

Read More »

उद्धव ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांच्या संकटावरून सत्ताधाऱ्यांवर आसूड, अवकाळीचं दुःख…

एकाबाजूला पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये पावसाने बऱ्यापैकी हजरी लावली अशा भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता हाता तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीपासूनच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने …

Read More »

शरद पवार यांनी घेतला पटेल यांचा समाचार, मलाही उत्सुकता आहे पण ते ईडीचे…

कर्जत येथील अजित पवार गटाच्या मंथन शिबीरात बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांच्यासह प्रफुल पटेल यांनीही टीका केली. या कार्यक्रमात बोलताना प्रफुल पटेल यांनी २००४ सालापासून शरद पवार हे भाजपासोबत जाणार होते. मात्र शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे आम्ही जाऊ शकलो नाही असे सांगत मी ही पुस्तक लिहिणार असून त्यात …

Read More »

अजित पवारांवर अनिल देशमुख यांचा पलटवार, पाच तास माझ्या घरी….

कर्जत येथील मंथन शिबीरात पक्ष कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी यांच्यासमोर अजित पवार यांनी बाजू मांडताना भाजपासोबत जाण्याच्या सर्व बैठकांना अनिल देशमुख हे उपस्थित होते. मात्र मंत्रिमंडळात मंत्री पद मिळणार नाही असे सांगताच अनिल देशमुख यांनी मंत्री पद नाही तर मी तुमच्यासोबत नाही असे जाहिर करत आमच्यासोबत येण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट अजित …

Read More »

शरद पवार यांचा अजित पवार यांना सूचक इशारा, ५१-५२ लोकं हे पराभूत….

पुण्यात १९७८ साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये तरुणांना मोठी संधी देऊन आम्ही निवडणूक लढवली व त्यातील साठ उमेदवार निवडून आले. निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्यांचं सरकार आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात गेलो होतो. तिथून परत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की साठ आमदार निवडून आले होते, त्यातील सहाच शिल्लक राहिलेत व बाकीचे सगळे …

Read More »

मुंबईत नऊ जानेवारीला शाश्वत पर्यावरण विकास परिषद कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची माहिती

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत ९ जानेवारी, २०२४ रोजी “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »