Tag Archives: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार आळंदीतील ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव कार्यक्रम

प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज …

Read More »

जम्मूमध्ये पूर्णतः ब्लॅक आऊटः पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ले गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ल्याला सुरुवात

भारताने आपल्या आकाशातून अनेक क्षेपणास्त्रे रोखल्यानंतर एका दिवसानंतर, शुक्रवारी रात्री जम्मूमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट झाले आणि सायरन वाजले. सकाळी ८.३० च्या सुमारास, शहरात तसेच सांबा सेक्टरमध्येही स्फोटांचे आवाज ऐकू आले. संरक्षण सूत्रांनी सांगितले की जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्ये ड्रोन दिसले आहेत आणि ते काम करत आहेत. “जम्मूमध्ये आता ब्लॅकआउट, शहरात …

Read More »

मुंबई मेट्रोचा प्रवास सुसाट; बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो मार्गाचे लोकार्पण मेट्रो तीनच्या अंतिम मार्गाचे ऑगस्टमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील टप्पा 2 अ बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानका दरम्यानच्या (९.७७ किमी) सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मेट्रो तीनच्या आचार्य अत्रे चौक ते कुलाबा या मार्गावरील अंतिम टप्प्याचा शुभारंभ येत्या ऑगस्ट महिन्यात प्रधानमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्या रद्द

भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, सायबर गुन्हे व फसवणूक टाळण्यासाठी अधिक काम करणार महाराष्ट्र सायबरच्या चॅटबॉट व माहितीपटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सायबर सुरक्षेसाठी देशातील अत्याधुनिक सुविधा महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हे, सायबर फसवणूक व मानवी तस्करीपासून लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.या पुढील काळातही अधिक परिणामकारपणे काम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सायबरच्या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बॉट व सायबर जागरुकता माहितीपट या नाविन्यपूर्ण …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना जलसंधारण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल

राज्यातील जलसंपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन आणि शेतीला पोषण देणारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतला ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना  महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विकासाचे नवे पर्व घडवते आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे धरणांत साचलेल्या गाळाचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर शिवारांमध्ये करणे. परिणामी, जलसाठ्याची क्षमता वाढवली जाते आणि गाळातील पोषणमूल्ययुक्त माती शेतजमिनीत वापरून …

Read More »

घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर दिलीप भोसले समितीकडून अहवाल सादर

घाटकोपर परिसरात होर्डिंग्ज पडण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुंबई न्यायमूर्ती दिलीप भोसले समितीने बुधवार, ७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला अहवाल सादर केला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार, पुढील कारवाईसाठी हा अहवाल आता सीलबंद लिफाफ्यात गृह विभागाकडे सादर करण्यात आला आहे. अहवालातील मजकुरात घटनेच्या तपासातील निष्कर्ष तसेच भविष्यात …

Read More »

चौंडीतील मंत्री परिषदेच्या बैठकीत घेतले महत्वाचे हे निर्णय बहुतांश निर्णय पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधअयक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे आज घेण्यात आली. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी “आदिशक्ती अभियान” व “आदिशक्ती पुरस्कार”, राहुरी येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व त्यासाठीच्या पदांना मंजूरी, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा २०२५ साठी प्राधिकरणाचा अध्यादेश, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन

पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, नवी मुंबईत ‘एज्यू सिटी’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार

सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न आता येथेच पूर्ण होईल, असा विश्वास …

Read More »