Breaking News

Tag Archives: मुख्यमंत्री

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनों शिक्षणासाठी परदेशी जायचय तर मग ही बातमी तुमच्यासाठीच

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. या योजनेसाठी सन २०२३-२४ या वर्षाकरिता अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून ५ जुलै २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन …

Read More »

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेना पत्र, आदिवासी विभागाचे ते अन्यायकारी पत्रक रद्द करा

आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग ३ व ४ च्या रोजंदारी व तासिका तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे सरकारी पत्रक अन्यायकारी आहे. हे कर्मचारी अत्यंत अल्प मानधनावर दुर्गम भागात काम करत आहेत. शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन कामावरून काढून टाकण्याचे शासन पत्रक रद्द करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

अजित पवार यांनी सांगितले की, त्यांच्या बंडाला आणि सरकारला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याच्या घटनेला २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. १९ जून २०२२ रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे २५ आमदारांसह सुरतला रवाना झाले. त्यानंतर, राज्यातील राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. परिणामी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, ते अजूनही भाषणच ठोकतायत..

भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांचं दुकान आम्ही का बंद केलं? याचं कारणही देवेंद्र …

Read More »

उध्दव ठाकरे यांचे आव्हान, रशिया-युक्रेन युध्द थांबविल्याच्या भाकडकथा सांगता मग मणिपूर… पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर साधला निशाना

जर्मनीत हिटलरही सत्तेत आला होता. त्यानेही सुरुवातीला सर्व प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवले. जेणेकरून त्याच्या विरोधात बातम्या येऊ नये यासाठी. तसाच काहीसा प्रकार आपल्याकडेही सुरु असून सध्या जे काही सुरु आहे तो प्रकार सत्तेची मस्ती आहे, हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे तो फोडायला वेळ लागणार नाही. एवढीच मस्ती असेल तर मणिपूरमध्ये …

Read More »

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ निर्देश आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत सुसुत्रता ठेवा

राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसुत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू …

Read More »

तिलारी आंतरराज्य प्रकल्प कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकार ३३० कोटी रुपये देणार मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या बैठकीत निर्णय

महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या ६ व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे जलसंपदा मंत्री …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल,… पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करतेय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगतानाच यावर प्रकाश टाकणारे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविले आहे. …

Read More »

अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासनाचा प्रयत्न

गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०२० मध्ये गिरणी कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या सदनिका …

Read More »

शिंदे-फडणवीसांमध्ये दिलजमाई? वर अजित पवार यांची स्पष्टोक्ती, मला काहीही वाटत नाही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून रंगल्या आहेत. मंगळवारी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचा दावा करणारी जाहिरात सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रांमध्ये झळकली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्यानंतर बुधवारी शिंदे गटाकडून नवी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून …

Read More »