Tag Archives: अतुल सावे

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला, संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यावर जलिल यांचे आरोप

छत्रपती संभाजी नगरातील बायजीपुरा जिन्सी भागात महापालिका निवडणूकीच्या प्रचारासाठी गेलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या वाहनावर काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी इम्तियाझ जलील यांना वाहनातून बाहेर खेचून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. परंतु इम्तियाज जलील यांनी या कारणामागे भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे असल्याचा …

Read More »

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शाळांना नोंदणी करण्याचे आवाहन १ ली ते १० वी पर्यंतच्या शाळांना विभागाचे आवाहन

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पद्धतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शाळांनी महाडीबीटी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,ओबीसींवर अन्याय होणार नाही; खोट्या नोंदी नकोच चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास आक्षेप

ओबीसींच्या मनात आपल्यावर अन्याय होईल अशी भीती आहे. पण, तसे काही होणार नाही. कुणबी नोंदी आहेत,त्यांनाच अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळणार असून त्यासाठी प्रमाणपत्र, कुणबी नातेसंबंध, ग्रामसमिती, तहसीलदारांच्या स्तरावरील समितीचा अहवाल घ्यावा लागणार आहेत. वंशावळ जुळल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरच दाखला देण्यात येईल. फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची …

Read More »

अतुल सावे यांची माहिती, परदेशी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती (विजाभज), इतर मागास वर्ग (इमाव) आणि विशेष मागास प्रवर्ग (विमाप्र) मधील विद्यार्थ्यांसाठी परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ मे २०२५ अशी होती. ही मुदत वाढवून ६ जून २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी परदेश शिक्षण शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन …

Read More »

घरकुल योजनांमधील लाभार्थ्यांना एकसारखा निधी देण्याबाबत निर्णय घेऊ मंत्री इतर मागास बहुजन कल्याण अतुल सावे यांची विधान परिषदेत माहिती

राज्यात राबविल्या जाणाऱ्या विविध घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना वेगवेगळे अनुदान दिले जाते. या योजनांना एकसारखे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले असून त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते …

Read More »

अतुल सावे यांचे आदेश, विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर करा इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर दिले आदेश

इतर मागास प्रर्वगातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व वसतिगृह मिळण्याबाबत तसेच येणाऱ्या शैक्षणिक अडचणी तातडीने दूर करून या कामाला प्राधान्य द्यावे, असे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागाची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. मंत्री अतुल सावे म्हणाले की, इतर …

Read More »

अतुल सावे यांची घोषणा, येत्या काळात प्रत्येक गिरणी कामगारांना घरे मिळतील १ लाख ८ हजार जणांना घरांचे वाटप करणार

अनेक दिवसांपासून गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे, यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात येत आहे. आजमितीस गिरणी कामगारांचे १ लाख ७४ हजार अर्ज अर्ज प्राप्त झाले. त्यात कामगार विभागाने …

Read More »

मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २ हजार ३० सदनिकांची ऑनलाइन सोडत मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार-गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केले. म्हाडाच्या …

Read More »

झोपू योजनेतील घरे विकण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने देणार मंत्री अतुल सावे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची माहिती

झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात झोपू योजनेतील घरे विक्री करण्यासाठी ना – हरकत प्रमाणपत्र लवकरच ऑनलाईन पद्धतीने दिली जाणार आहेत. अर्ज केल्यानंतर ४५ दिवसांत प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे विकण्यासाठी लागणारे ना – हरकत प्रमाणपत्रबाबत सदस्य भाई गिरकर यांनी प्रश्न …

Read More »

झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ मधील झोपडीच्या हस्तांतराबाबत सवलत योजना आणणार आशिष शेलार यांच्या प्रश्नाला उत्तर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची माहिती

झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकांने विकली तर नव्याने झोपडे घेणाऱ्या मालकांचे नाव परिशिष्ट २ मध्ये समाविष्ट करण्याबात मुंबईतील बहुसंख्य एसआरए योजनांमध्ये निर्माण झालेला मोठा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्याची तयारी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दर्शवली असून याबाबत …

Read More »