Breaking News

Tag Archives: अर्थसंकल्प

शरद पवार यांचा मार्मिक सवाल, खिशात ७० रूपये तर मग १०० कसे खर्च करणार? अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा असल्याची केली टीका

खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च करणार कसे? हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा आहे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. अजित पवार यांनी सादर केलेल्या १० व्या अर्थसंकल्पावरून शरद पवार म्हणाले की, एखाद्या गोष्टीला १०० रुपये खर्च असेल आणि माझ्या …

Read More »

जयंत पाटील यांची खोचक टोला, अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ अजित पवार यांनी सांदर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. आजचा अर्थसंकल्प म्हणजे ‘चादर लगी फटने और खैरात लगी बटने’ असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अर्थसंकल्पावर सविस्तर बोलताना जयंत …

Read More »

यंदाचा अर्थसंकल्पातून निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गायब होणार ? लोकसभेच्या चालू अधिवेशनात मांडणार अर्थसंकल्प

या जुलैमध्ये सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विशिष्ट निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट न ठरवून फेब्रुवारीमध्ये शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात सादर केलेला दृष्टिकोन सुरू ठेवण्याची केंद्राची योजना आहे. त्याऐवजी, निर्गुंतवणूक भांडवली प्राप्ती अंतर्गत वर्गीकृत केली जाईल, जसे की या वर्षाच्या सुरुवातीला होते. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही आधीच निर्गुंतवणुकीचे धोरण बदलले आहे. उद्दिष्ट सोडून …

Read More »

आगामी अर्थसंकल्पात स्पेक्युलेटीव्ह उत्पन्नावर कराची शक्यता व्यावसायिक उत्पन्नावरून सट्टा उत्पन्न

सरकार फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) विभागातील किरकोळ सहभागाला परावृत्त करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार करत आहे, ज्यात F&O ला ‘व्यावसायिक उत्पन्न’ वरून ‘सट्टा उत्पन्न’ कडे नेणे यासह केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ मध्ये अपेक्षित असल्याचा मुद्दा एका अहवालाच्या आधारे सांगण्यात आले आहे. असा बदल पूर्ण वर्षाच्या अर्थसंकल्पात सादर केल्यास, F&O व्यवहारांना कराच्या रूपात …

Read More »

आगामी अर्थसंकल्प छोटी शहरे आणि ग्रामीण भागावर आधारीत अर्थमंत्रालयाकडून माहिती मागविण्याचे काम सुरु

२२ जुलै रोजी पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याआधी, अर्थ मंत्रालयाने विविध मंत्रालयांना आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि लहान शहरे आणि ग्रामीण भारतामध्ये रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी धोरणात्मक सूचना मागविण्यास सांगितले आहे. मंत्रालयांना इतर गोष्टींबरोबरच ग्रामीण आणि लहान शहरांच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी धोरणात्मक इनपुट्स आणण्यास सांगितले आहे; या भागात सामाजिक, आर्थिक आणि डिजिटल …

Read More »

महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्प सादर होणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

देशातील लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्याचा निकालही जाहिर झाला. मात्र ऐन मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने त्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करता आला नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती यापूर्वीच अजित पवार यांनी दिली होती. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

केंद्रातील अर्थसंकल्पिय अधिवेशन दोन टप्प्यातः जुलै महिन्यात अर्थसंकल्प? मोहरमसाठी संसद होणार स्थगित

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात सादर होण्याची शक्यता आहे, असे सरकारी सूत्रांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, अर्थ मंत्रालय १८ जूनपासून विविध भागधारकांशी अर्थसंकल्पीय सल्लामसलत सुरू करेल. दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याचे संकेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या X वर पोस्ट केल्यानंतर मिळाले. ते म्हणाले: …

Read More »

नव्या सरकारचा अर्थसंकल्प कसा असेल? आरबीआयने दिले हे पाच मुद्दे जीडीपीचे लक्ष्य वास्तवादी राहणार

पुढील केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ साठी पुढील उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पेक्षा कोण चांगले आहे? भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए NDA सरकारने या वर्षी फेब्रुवारीमध्ये २०२४-२५ साठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून, १८ व्या लोकसभेत सरकारसाठी कमी बहुमताने इलेक्टोरल नंबर गेमने समीकरण पूर्णपणे बदलले आहे. भाजपाची स्वतःची संख्या २७२ …

Read More »

‘अर्थसंकल्पात घोषणाचा सुकाळ, शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ’

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला.राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक होत ‘अर्थसंकल्पात घोषणांचा …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, सरकारचे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात पाऊस

महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी केवळ घोषणा केल्या आहेत. राजकीय तोडफोड, महागाई, बेरोजगारी, पेपरपुटी, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे सरकारने केलेले प्रकार यामुळे राज्यातील जनतेमध्ये या ट्रिपल इंजिन सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीत जनता या महायुतीचा ‘हिशोब’ करणार आहे. सरकार सर्व आघाड्यांवर …

Read More »