सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे उभारण्यात येणाऱ्या ३० हजार घरांच्या प्रकल्पाला राज्य शासनाची दिलासादायक मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी अनर्जित, नजराणा रक्कमेसह अकृषिक वापर शुल्कातून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे …
Read More »अर्थसंकल्पातून स्मारके, घरे, महामंडळे, विभागनिहाय निधींची अजित पवार यांच्याकडून घोषणा शिवाजी महाराजांचे स्मारकाची घोषणा पण निधी नाही
राज्याच्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागात घोषित स्मारकाशिवाय काही नव्या स्मारकांची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांसाठी सर्वांसाठी घरे याेजनेखालील धोरण नव्याने जाहिर करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर विभाग निहाय निधींचे वाटप करत दिव्यांगासाठी आणि असंघटीत कामगार आणि शेतकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येणार आहे. तसेच …
Read More »महाराष्ट्रात रोजगारासाठी येणारे स्थलांतरित मजूर सुरक्षित नाहीत राज्यातील रोजगाराबाबत स्थलांतरीत मजूरांनाच प्रश्न
नवीन कुमार राजेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे रहिवासी आहेत. दादरच्या भाजीपाल्याच्या बाजारपेठेत बटाटे-कांद्याचे बोरे वाहून नेण्याचे काम केले जाते. तो आपल्या गावी परतला. एक वर्ष नोकरी न मिळाल्याने तो मुंबईत परत आला आणि भारवाहक म्हणून काम करू लागला. दिवसभर घाम गाळून राहिल्यानंतर, त्याला मिळणाऱ्या मोबदल्यात तो त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यात …
Read More »कोविडमध्ये असंघटीत कंपन्या लॉक डाऊन झाल्या पण पुन्हा उभ्या राहिल्या ५.०३ दशलक्षांपर्यंत संख्या वाढली
दुसऱ्या कोविड लॉकडाऊन दरम्यान, एप्रिल ते जुलै २०२१ या कालावधीत असंघटित उद्योगांची संख्या ५.०३ दशलक्षपर्यंत घसरली, परंतु काही महिन्यांत ती २०२१-२२ मध्ये ५९.७ दशलक्षांपर्यंत वाढली. २०२२-२३ मध्ये अशा उद्योगांची संख्या आणखी ५.८८% वाढून ६५ दशलक्ष झाली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या २०२१-२२ आणि २०२२-२३ साठी अनइन्कॉर्पोरेटेड …
Read More »राज्य सरकारकडून घरेलू कामगारांना गाजर
राज्यातील विशेषतः केंद्र आणि राज्य सरकारने आरोग्य विषयक सुविधा पुरविण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर लाखो आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांची भरती केली. परंतु मागील दिड महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांना वाढीव मानधन देण्याचा निर्णय घेतलेला असतानाही केवळ राज्याच्या तिजोरीत पुरेसा पैसा नसल्याने तो निर्णय अंमलात आणला नाही. तर …
Read More »राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे आश्वासन
“राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व प्रकारच्या कामगार नोंदणीसाठी कामगार सेतू नोंदणी केंद्र, उभारण्यात येणार आहेत”, असे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विधानसभेत सांगितले. धाराशिव जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजन योजनेत झालेला आर्थिक …
Read More »नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून सुविधा द्या कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे निर्देश
राज्यात असंघटीत क्षेत्रातील कुठलाही कामगार नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी विभागाने कामगारांची मोहिम स्तरावर नोंदणी करावी. नोंदणीकृत कामगारांना सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री खाडे बोलत होते. बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद …
Read More »
Marathi e-Batmya