Tag Archives: आधारभूत किंमत

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, दीडपट हमीभाव देणे दूरच GST च्या माध्यमातून शेतक-यांची लूट कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना समज द्यावी

केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांची आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना गॅरंटी, आम्ही देऊ एमएसपी…

देशातील शेतकऱ्यांच्या शेत मालाला एमएसपी अर्थात आधारभूत किंमत मिळावी म्हणून पंजाब, हरियाणामधील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात चलो दिल्ली आंदोलन पुकारले. तसेच केंद्र सरकारकडून आधारभूत किंमतीबाबतचा निर्णय जाहिर केल्याशिवाय माघारी फिरायचे नाही असा निश्चय करून दिल्लीच्या दिशेने शेतकरी मोर्चा निघाला. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यावर …

Read More »

धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर

शासनाने पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अंतर्गत धान व भरडधान्याच्या (ज्वारी, बाजरी, मका व रागी) किमान आधारभूत किंमती (minimum support price MSP) जाहीर केल्या आहेत. सदर योजनेअंतर्गत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, हमीभावाचे गाजर दाखवून… शेतकऱ्यांची चेष्टा थांबवा; अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील

देशातील शेतकऱ्यांना हमीभावाचे गाजर दाखवून केंद्र सरकारने सत्ता मिळविली. केंद्रीय मंत्रिमंडळाने १८ ऑक्टोबरला हंगाम २०२४-२५ च्या रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर केले. ही हमीभावाची वाढ केवळ कागदी खेळ आहे. नऊ वर्ष जनता केंद्र सरकारला सहन करत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये. आता शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी. अन्यथा सरकारला याचे गंभीर …

Read More »