Tag Archives: उच्च न्यायालय

शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका १९९५ च्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अनियमितता केल्याचा याचिकेत आरोप

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अॅडजेस्टमेंट म्हणून भाजपाचे माजी नगरसेवक तथा विकासक मुरजी पाटील यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मात्र मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरताच झोपडपट्टी पुर्नवसन योजने अनियमितता आणि रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप करत मुरजी पटेल यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. …

Read More »

सलमान खान गोळीबार प्रकरण : उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, दबाव टाकणार नाही उच्च न्यायालयाने थापनच्या कुटुंबीयांना ठणकावले

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनने पोलिस कोठडीत आत्महत्या केली होती. या आत्महत्या मृत्युची चौकशी करणाऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांवर अहवाल सादर करण्याचा दबाव टाकणार नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच, न्यायदंडांधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ दिली. न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशी अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देताना ही …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, अश्लील साहित्य’ म्हणून कलाकृती नष्ट करू नका सीमाशुल्क विभागाला करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

‘अश्लील साहित्य’ असल्याच्या कारणावरून गेल्यावर्षी जप्त केलेल्या प्रसिद्ध कलाकार एफ.एन.सौझा आणि अकबर पदमसी यांच्या कलाकृती (पेंटिंग) पुढील आदेश येईपर्यंत नष्ट करू नका, असे आदेश उच्च न्यायालयाने सीमाशुल्क (कस्टम) विभागाला दिले. व्यावसायिक आणि कलेचे जाणकार असलेले मुस्तफा कराचीवाला यांच्या मालकीच्या बीके पॉलिमेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर न्या. …

Read More »

उच्च न्यायालयाकडून काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला दिलासा चेंबूर येथे दुचाकीला धडक प्रकरण पोलिसांवर ठपका

बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी ५ ऑक्टोबर रोजी अटक केलेला काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरेला (४२) उच्च न्यायालयाने बुधवारी दिलासा दिला. तसेच, त्याची अंतरिम जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेशने आपली अटक बेकायदेशीर असून आपल्याला ठोठावण्यात आलेली पोलीस व न्यायालयीन कोठडी …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, पोलिसांवर काय कारवाई केली बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेची चौकशी आणि बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात कुचराई करणाऱ्या बदलापूर पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली. विभागीय चौकशीनुसार एका अधिकाऱ्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप सिद्ध झाले आहेत. …

Read More »

कुर्ल्यातील शाळा शिक्षक मतदानाच्या दिवशीच निवडणूकीची कामे करणार निवडणूक आयोगाची उच्च न्यायालयात माहिती

कुर्ला येथील खासगी शाळेतील शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीत आणि मतदानाच्या एक दिवस आधी व मतदानाच्या दिवशी निवडणूक कामे लावली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयात दिली. त्यानंतर, परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावण्याविरोधात विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली. परीक्षाकाळात शिक्षकांना निवडणूक कामे लावणे हे विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन …

Read More »

४४ दिवसानंतर बदलापूर प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष, सचिवास अटक उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आज केली अटक

बदलापूर दोन चिमुरडींवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि प्रत्यक्ष घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या शाळेचे सचिव तुषार आपटे आणि अध्यक्ष उदय कोतवाल यांना ठाणे पोलिसांच्या परिमंडळ एकने ४४ दिवसानंतर आज अटक केल्याची माहिती पुढे आली …

Read More »

अखेर अक्षय शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार स्मशानमभूमीत दफन स्थानिकांचा विरोधाला न जुमानता केला दफनविधी

बदलापूर प्रकऱणातील अनेक गोष्टी उघडकीस येण्यापूर्वीच बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकांऊटर करत पोलिसांनी संपविले. त्यानंतर अक्षय शिंदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्याला दफन करण्यात यावे अशी मागणी त्याच्या पालकांनी आणि न्यायालयानेही तसे आदेश दिले. मात्र अक्षय शिंदे याच्या मृतदेह दफन करण्यासाठीही जमीन मिळत नव्हती. अखेर अक्षय शिंदे …

Read More »

अक्षय शिंदे एनकॉऊंटरप्रश्नी उच्च न्यायालयाचा सवाल, पोलिसांचा दावा स्विकारणे कठीण पोलिसांपेंक्षा ताकदवान होता मान्य करणे अशक्य

तळोजा जेल ते ठाणे दरम्यान मुंब्रा बायपास रोडवर बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एनकांऊटर प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी अक्षय शिंदे हा बलवान होता, आणि तो पोलिस अधिकाऱ्यांना तो नियंत्रित होऊ शकत नव्हता असे म्हणणे स्विकारार्ह नसल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदे याच्या …

Read More »

कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची याचिका फेटाळली राज्यपालांनी विवेकपूर्ण मंजूरी दिली-न्यायालयाचे मत

म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात मुडा MUDA कडून त्यांच्या पत्नीला जमीन देण्याबाबत भ्रष्टाचाराचे खटले दाखल करण्यासाठी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी तीन खाजगी व्यक्तींना दिलेल्या मंजुरीविरुद्ध कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेली याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी निर्णय दिला की, सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटले दाखल करण्यास …

Read More »