मॅच फिक्सिंग चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध, उच्च न्यायालयात जनहित याचिका चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी

‘मॅच फिक्सिंग, द नेशन ॲट स्टेक’ या २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोटावर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर मुस्लिम समाजाविरोधात नकारात्मकता पसरविण्याचे काम करीत असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. तसेच, ट्रेलर पाहता त्यामध्ये मुस्लिम समुदाय भारताविरूद्ध द्वेष बाळगतो अशी खोटी आणि समाजमनात दरी निर्माण करणारी कथा दाखविण्यात आल्याचा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.ण

चित्रपटाचा ट्रेलर २३ ऑक्टोबरला पाहिल्यानंतर चित्रपटातील चित्रण केलेली दृश्य आणि त्यासाठी वापरलेले काही संदर्भ पाहून धक्का बसला आणि खूप दुःख झाल्याचा दावा याचिकाकर्ता नदीम खान यांनी याचिकेत केला आहे. हा चित्रपट म्हणजे केवळ मुस्लिम समाजाचा अनादर करणारा तसेच त्यांच्या भावनांना दुखावणारा असून इस्लामबद्दल असहिष्णुता आणि गैरसमजाचे वातावरण निर्माण करणारा असल्याचे याचिकेत म्हटले आहे. ट्रेलरमध्ये काही दृश्य अतिरंजित आणि भडक दाखविण्यात आली असून काही संवाद हे भारताविरुद्ध हिंसाचाराचे समर्थन करणारे असून जसे भारतामध्ये रक्तस्त्राव केला पाहिजे आणि हे संवाद मुस्लिम पात्रांच्या मुखी देण्यात आले आहेत. त्यामुळे अशी खोटी आणि समाजमनात दरी निर्माण करणारी कथा तयार करून मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणारी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद दृश्ये यामध्ये वापरली आहेत. मुस्लिम पात्रांचे पूर्वग्रहदूषित चित्रण करून इस्लाम धर्म दहशतवाद आणि हिंसाचाराशी संबंध जोडण्यास प्रोत्साहन देणारा असल्याचे चित्रित केले आहे. हे चित्रण मुस्लिम समाजाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचणारे असून त्यांच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे आणि समाजात जातीय तेढ निर्माण करणारे असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

चित्रपटांच्या पात्रांची नावे मुस्लिम असून जी दहशतवादी कृत्यांमध्ये सामील असल्याचे दाखवले आहे. तसेच, ही पात्रे संभाषणांमध्ये “नारा-ए-तकबीर” आणि “अल्लाह-उ-अकबर” सारखे इस्लामिक शब्दप्रयोग वापरण्यातआ ले असून ते भारताबद्दल द्वेष पसरवतात, असे दाखवण्यात आले आहे. केल आहे. परंतु, या वाक्यांचा दहशवादाशी कोणताही संबंध नसून मुस्लिमांच्या आध्यात्मिक आचरणासाठी वापरण्यात येणारी महत्त्वाचे दोन शब्दप्रयोग आहे, या पवित्र्य शब्दप्रयोगांचा वापर देशविरोधी कारवायांसाठी केला जातो असे चित्रित करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक श्रद्धांचा अपमान, अनादर करण्यासारखे आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचेही उल्लंघन करण्यासारखे असल्याचेही म्हटले आहे. या याचिकेवर ११ नोव्हेंबर रोजी न्या. बीपी कुलाबावाला आणि न्या. सोमशेखर सुंदरसन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे, २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ‘ममॅच फिक्सिंग, द नेशन ॲट स्टेक’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णीने विशेष न्यायालयात केली आहे.

About Editor

Check Also

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत शासकिय संगणक प्रणालीमध्ये अधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक

बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *