मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर एकाच दिवसात मान्सूनचे पदार्पण महाराष्ट्रात झाले. पण मान्सूनच्या पावसाला मुंबईत पोहोचायला तीन दिवस लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पण तत्पूर्वीच कोकणात आलेल्या पावसाने मुंबईत रात्रीत आगमन करत रात्रभर मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मान्सूनने चांगलीच हजेरी लावत कोसळायला सुरुवात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वर्षभराचे पर्यटन कॅलेंडर तयार करा नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पर्यटकांना पर्यटन सुविधांची माहिती देण्याचे आवाहन
पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाने वर्षभरातील पर्यटनाचे वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव – सोहळ्यांचा समावेश करावा. यासोबतच देशातील टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या पर्यटन सुविधांची माहिती द्यावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करुन द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री …
Read More »अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती आयएएस अधिकाऱ्याकडून एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद काढून मंत्र्यांकडे सुपुर्द
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपामध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे राहत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. …
Read More »अंबादास दानवे यांची टीका, सरकार अदानीचे कर्ज माफ करू शकते पण शेतकऱ्यांचे नाही निवडणूकीतील आश्वासन पूर्ण करू शकत नाही
पीक कर्जमाफीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय धुमाकूळ सुरू झाला आहे. अजित पवार यांच्या विधानाला महायुतीतील मित्रपक्षांकडून पाठिशी घालण्याचा प्रयत्न सुरु केला असताना , शिवसेना उबाठाने मात्र अजित पवार यांच्या वक्तव्याचा विरोध करत, महायुती सरकारने खोटी निवडणूक आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. बारामतीतील एका कार्यक्रमात …
Read More »एकनाथ शिंदे यांची मान्यता, अमृत योजनेअंतर्गत कल्याण-डोंबिवलीसाठी ३५७ कोटींचा निधी नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार सुरळीत पाणी पुरवठा
कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन व …
Read More »राज्यपाल म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा आणि जातीमुक्त समाजनिर्मिती… परिवहन दिनानिमित्त आयोजित आदरांजली सभेत बोलताना व्यक्त केला निर्धार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन …
Read More »
Marathi e-Batmya