महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही. तसेच याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या पत्रावर निर्णय …
Read More »आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय आगरी समाजासाठी महानंडळ, नदी जोड प्रकल्प, शेती महामंडळाची जमिन एमआयडीसीला यासह अनेक निर्णय
राज्यात दसरा सण झाल्यानंतर कधीही विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करणार असल्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार निवडणूक आचारसंहितेपूर्वीची शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक असे सांगत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक समाजांना आकर्षित करण्यासाठी नवी …
Read More »विधानसभा उपाध्याक्षालाच सरकारच्या विरोधात आरक्षणासाठी करावे लागतेय आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण नको
साधारणतः दोन ते अडीच वर्षापूर्वी भाजपाचे धुरंधरे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्षांना फोडत राज्यात सत्तेवर आलो असल्याचे छातीठोक वक्तव्य केले. मात्र त्यांनीच फोडलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा विद्यमान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आदीवासी समाजाच्या आरक्षण प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण नको या …
Read More »क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सर्वात मोठ्या शिल्पाचे लोकार्पण ब्राँझ धातूच्या अर्ध शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकार्पण
महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील असे सांगत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, बदलापूर प्रकरणातील प्रश्नांची उत्तरे शिंदे-फडणवीस कधी देणार? महाराष्ट्रातील भगिनींची सुरक्षा करणे जमत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा
बदलापूर प्रकरणातील आरोपीचे एन्काऊंटर केल्याचे श्रेय घेण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यात स्पर्धा सुरु झाली आहे. शिंदेंचे कौतुक करणारी मोठी जाहिरात वर्तमानपत्रात झळकली तर फडणवीसांच्या नावाने मुंबईत ‘बदलापुरा’ अशी मोठी होर्डींग लावण्यात आली. भगिनींचे रक्षण करणारा अशी प्रतिमा यातून दाखवली आहे आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचा वसई-विरार उपजिल्हाध्यक्षांसह तिघांनी नालासोपारा …
Read More »संजय राऊत यांचा सवाल, संडास धुणारा बंदुकीबरोबर कधीपासून खेळायला लागला संस्थेच्या संचालकाला वाचविण्यासाठी हे नाटक
बदलापूर प्रकरणातील आरोपी हा त्या शाळेत संडास धुवणारा होता. आणि एक संडास धुणारा व्यक्ती बंदूकीसोबत खेळू शकतो का असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबधित शाळेच्या ट्रस्टीला वाचविण्यासाठीच कालचं हे नवं कथानक रचलं गेल्याचा गंभीर आरोप शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला. पुढे बोलताना …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे २४ महत्वाचे निर्णय ब्राम्हण परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसह दूधाच्या अनुदानात वाढ
मागील काही दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणूकीचे वारे वहात आहे. यापार्श्वभूमीवर जास्तीत जास्त राज्यातील मतदारांना खुष करण्यासाठी निर्णयांचा धडका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने घेतला आहे. त्यातच प्रत्येक राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत १० ते १५ विषयांवर निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने आज तब्बल २४ निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. विशेष म्हणजे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, सेमी कंडक्टर उद्योगात ४०० जणांना रोजगार आरआरपी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
एक मराठी माणूस इलेक्ट्रॉनिक्स सेमिकंडक्टर प्रकल्प OSAT (Outsourced Semiconductor Assembly and Testing) उभा करण्याची क्रांती करतो, याचा मला अभिमान आहे. हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करीत आहे आणि यापुढेही करीत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापे एमआयडीसी येथे केले. ठाणे जिल्हातील महापे एमआयडीसी येथे मे.आर.आर.पी कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक्स …
Read More »मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसची पोलिसात तक्रार फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न- काँग्रेसची कुलाबा पोलीस स्थानकात तक्रार
कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती १३ सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुतीने केंद्राच्या पाया पडावं
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि …
Read More »
Marathi e-Batmya