दावोसमध्ये ६१ कंपन्यांशी केलेल्या करारातून १५.७० लाख कोटींची गुंतवणूक व १५.९५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. याआधीही असेच मोठे करार झालेले आहेत, …
Read More »एमएमआरडीए मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे विकासाचे माहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार देणारे आणि विकासाचे माहेर असलेले मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे राज्याचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील वांद्रे कुर्ला संकुल येथील कन्व्हेशन सेंटर येथे ‘एमएमआरडीए’ च्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात …
Read More »रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, २०२७ च्या कुंभमेळ्याची तयारी करा धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी ‘महाकुंभा’ची निर्मिती करा
नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर) उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ३ कोटी ८ लाखांचा निधी बाबा आमटे यांच्या संस्थेसाठी राज्य सरकारकडून निधी
चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी १ कोटी ८६ लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी १ कोटी २२ लाख रुपये असे एकूण ३ कोटी ८ लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले …
Read More »उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विभागातील कामासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शहरांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवावे
राज्यातील ४२३ शहरांमधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या शहरांमध्ये सर्व अत्यावश्यक आणि दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नगरविकास विभागामार्फत येत्या १०० दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सादरीकरणाद्वारे चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठाला डिवचले, जनतेनेच दाखवून दिले खरी शिवसेना… नवी मुंबई, पालघर, मुरबाड, नाशिक,धुळे, साक्री, परभणी येथील उबाठा गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश
उबाठा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत असे म्हणाले होते. आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची..? असे वक्तव्य केले होते. मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिले असल्याचा खोचक टोला उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ …
Read More »एकनाथ शिंदे यांची माहिती, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी
‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करून नागरिकांना म्हाडा तसेच गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज सुलभपणे लाभ घेता यावा. त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा. मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »मंत्रिमंडळाचा निर्णयः सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणणार… व्यक्तीला आधार, तसा आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी
आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामे करतात. त्यातून …
Read More »उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला महाबळेश्वर आणि पाचगणी मधील समस्यांचा आढावा विविध विकासकामांसाठी महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही नगर परिषदांना निधी उपलब्ध करून देणार
महाबळेश्वर आणि पाचगणी येथील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तसेच इथे येणाऱ्या पर्यटकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सातारा जिल्ह्यातील दरे या मूळ गावी गेले असता त्यांनी आपल्या निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हे …
Read More »
Marathi e-Batmya