Tag Archives: एमपीएससी

असंवेदनशील दृष्टीकोनावरून एमपीएससीला उच्च न्यायालयाने फटकारले दृष्टीहीन व्यक्तींबाबत समावेशक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज

अपंग किंवा दृष्टीहीन व्यक्तींबद्दल असंवेदनशील दृष्टीकोन बाळगू नका, त्यांच्याबद्दल संवेदनशील आणि समावेशक दृष्टिकोन स्वीकारा, अशा शब्दात उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. तसेच, गुजरातस्थित संपूर्णतः दृष्टिहीन महिलेला एमपीएससीअंतर्गत लिपिक-टंकलेखक पदासाठी तिच्या नोकरीच्या पसंती अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची परवानगी दिली. प्रतिवादी एमपीएससीचा याचिकाकर्तींच्या प्रती दृष्टिकोन अपंग व्यक्तींबद्दल …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मैत्रेयी जमदाडेचा सत्कार एमपीएससीच्या परिक्षेत मुलींमध्ये राज्यात अव्वल

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ जयंती निमित्त सावित्रीमाई जयंती उत्सव घेण्यात येत आहे. या ठिकाणी विविध योजनांची माहिती देण्यासाठी ‘महाज्योती’ने स्टॉलच्या माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत २०२२-२३ वर्षात घेण्यात …

Read More »

एमपीएससीने केली गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षा योजनेत सुधारणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली सुधारणा

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ या सेवेतील विविध संवर्गाची भरती प्रक्रिया आयोगामार्फत केली जाणार असल्याचे आयोगाने कळविले आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठ्या प्रमावर वाढ होत आहे. परीक्षा …

Read More »

जयंत पाटील यांची इशारा, तर एमपीएससी लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती

एमपीएससीत सरकारी हस्तक्षेप वाढत असल्याने एमपीएससीची स्वायत्तता धोक्यात असल्याचे वृत काही वर्तमान पत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारी हस्तक्षेप वाढल्याने एमपीएससी MPSC लाही भ्रष्टाचार, पेपरफुटीची कीड लागेल अशी भीती व्यक्त केली. जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही प्रतिक्रिया …

Read More »

एमपीएससीने मुलाखती पुढे ढकलल्या आता ३० ऑगस्टला होणार मुलाखती

एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २३ ऑगस्ट, २०१४ रोजी होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती ३० ऑगस्ट, २०२४ रोजी होणार आहेत. महाराष्ट्र आयोगातर्फे संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ पदांच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखतींचे आयोजन आयोगाच्या नवी मुंबई, सीबीडी, बेलापूर येथील कार्यालयात …

Read More »

अतुल लोंढे यांचा इशारा, MPSC व IBPS च्या परीक्षा एकाच दिवशी, तारखा बदला अन्यथा… MPSC च्या आडमुठ्या भूमिकेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे.

MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग युवकांचे आयुष्य घडवणारे आहे की त्यांची कत्तल करणारा जनावरांसारखा कत्तलखाणा आहे. १८ व २५ ऑगस्ट रोजी IBPS ने देशपातळीवर परीक्षा आयोजित केलेल्या असताना त्याच तारखांना MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षा आयोजित केल्या आहेत, यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. MPSC एमपीएससीने परिक्षांच्या तारखांमध्ये बदल करुन दोन …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिर केले सुधारीत परिक्षेचे वेळापत्रक राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ रविवार, २१ जुलै, २०२४ रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून ३० मे, २०२४ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच ‘या’ परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत,जाहिरात प्रसिद्ध होऊन …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, MPSC च्या परीक्षा पद्धतीविरोधात आंदोलन केल्याचा बदला…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व शिंदे-पवार-फडणवीस सरकारने स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ चालवला आहे. MPSC ने नुकतीच केवळ २०५ पदांची जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधिक्षक, तहसीलदार सारख्या प्रशासनातील महत्वाची पदे नाहीत. MPSC साठी सर्वसामान्य गोरगरीब व ग्रामीण भागातील ३२ लाख विद्यार्थी तयारी करत आहेत, …

Read More »

न्यायालयामुळे नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेल्या उमेदवारांनी मानले मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार

‘ साहेब, तुम्ही आशेचा किरण होता आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे. यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आनंद, समाधान परतले आहे,’ अशा शब्दांमध्ये एमपीएससी व अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही या भावनांचा स्वीकार …

Read More »