Tag Archives: चंद्रशेखर बावनकुळे

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महसूल परिषदेचा समारोप

महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारा हा विभाग असून अधिक लोकाभिमुखतेसाठी महसूल परिषदेत अभ्यास गटांनी सादर केलेल्या शिफारशी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दिशादर्शक ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी स्वीकारला महसूल विभागाचा पदभार ‘गतिमान आणि पारदर्शक कामासाठी पेपरलेस कामकाज’

मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव हा पदभार स्वीकारला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. विकास खारगे यांच्याकडे यापूर्वी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. तत्पूर्वी त्यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांत …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी शिफारस करणार अपघाती विमा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना शिफारस करणार

सर्पमित्र हे ग्रामीण व शहरी भागात सापांपासून नागरिकांचे प्राण वाचविण्याचे काम करतात. या सर्पमित्रांना स्वतंत्र ओळख मिळावी, तसेच त्यांच्याबाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांना अथवा कुटुंबियांना अपघाती विमासारखी आर्थिक भरपाई मिळावी यासाठी वन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली जाईल, त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन, झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेला कुणीही बेघर होणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाननुसार काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या प्रश्नावरील उत्तरा दरम्यान माहिती

सर्वोच्च न्यायालयाने २२ मे २०२५ रोजी आदेश पारित करून विदर्भातील झुडपी जंगल जमीन वन क्षेत्र म्हणून घोषित केलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पालन करीत झुडपी जंगल क्षेत्रावर घर असलेल्या नागरिकांना शासन बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही विधानसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विदर्भातील सहा जिल्ह्यातील …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार, ५० लाख कुटुंबांना लाभ

राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित होती. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाण पासून २०० मीटर पर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एक गुंठेपर्यंत जमिन व्यवहारासाठी …

Read More »

अंबादास दानवे यांचा सवाल, एक रूपयांची संपत्ती नावावर नसताना ६५ कोटींची निविदा कशी भरली? सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हॉटेल खरेदी प्रकरणी अडचणीत

२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या नावे एक रूपयांची मालमत्ता नसल्याची माहिती दिली होती. तसेच त्यांच्या नावे कोणतीही संपत्ती नसल्याचे सांगितले होते. मग कोणतीही मालमत्ता आणि संपत्ती नावे नसताना हॉटेल विट्स खरेदी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, भूमी गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन आठ मुद्रांक अधिकाऱ्यांवरही कारवाईचे संकेत

नाशिक जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भूमाफियांनी केलेल्या सिटी सर्व्हे क्रमांक १४४ भूखंडाच्या फसवणुकीप्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर येत्या एका महिन्यात विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार,४ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. भाजपाचे आमदार गोपीचंद …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, २४ तास वाळू वाहतुकीला परवानगी; मोफत वाळू वितरणाचीही हमी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर

राज्यात वाळू वाहतुकीसंदर्भातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला निर्णय अखेर घेण्यात आला असून, सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदन सादर करत केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सद्यस्थितीत सकाळी ६ …

Read More »

काँग्रेसला हात दाखवित कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी श्री. कुणाल पाटील व त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. धुळ्याचे पालक मंत्री जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. राम …

Read More »

काँग्रेस नेते स्व.वसंतदादा पाटील यांची नात सून जयश्री पाटील भाजपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

पिढ्यानपिढ्या काँग्रेसमध्ये घालविलेले स्व.वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे,स्व वसंतदादा पाटील यांचे पुत्र मदन पाटील हे काँग्रेसमधूनच आमदार आणि खासदार पदी निवडूण आले. तर काही काळ राज्याच्या मंत्रिमंडळात ते मंत्री म्हणूनही राहिले. …

Read More »