चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल, एकदा चष्मा लावून बघा, रोहित पवार म्हणाले निनावी का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निनावी जाहिरातीवरून एकमेकांवर सोडले टीकास्त्र

राज्य सरकारमधील भाजपाच्या मित्र पक्षातील मंत्र्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठमोठ्या जाहिराती निनावी पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आले. त्यावरून रोहित पवार यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षावर टीकास्त्र सोडले. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात खंडण्या कशा गोळा केल्या गेल्या तसेच कशा जाहिराती दिल्या गेल्या यावरून एकदा चष्मा लावून बघण्याचा टोला रोहित पवार यांना लगावला. तर रोहित पवार यांनी जाहिराती निनावी का असा सवाल करत भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, छत्रपती शिवरायांना नतमस्तक होत हे राज्य महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेकरीता समर्पित आहे असा संदेश देणारी जाहिरात कुणी आदरणीय देवेंद्रजींच्या प्रेमापोटी दिली तर रोहित पवारांच्या पोटात का दुखत आहे?

त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून रोहित पवार म्हणाले की, तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का? असा खोचक सवालही यावेळी केला.

रोहित पवार पुढे म्हणाले की, या जाहिराती भाजपाने दिल्या असतील तर भाजपाने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपाने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? असा सवाल करत या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? असा सवाल करत करा जाहीर! असे आव्हानही यावेळी दिले.

About Editor

Check Also

महाराष्ट्र शासन आणि ब्रिस्टॉल विद्यापीठ यांच्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार गुणवंत विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती

महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *