Tag Archives: देवेंद्र फडणवीस

नाना पटोले यांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयामुळे विदर्भात भूमिहीन होण्याचा धोका सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, पुनर्विचार याचिका दाखल करावी

विदर्भातील सहा जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करून ८६ हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे या जमिनीला डिनोटीफाय करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका असून या भागाच्या विकासाला खिळ बसणार आहे. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु ७१३ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण

शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्याहस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ७१३ कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले. यावेळी  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा …

Read More »

धुळेमध्ये सरकारी रेस्ट हाऊसमध्ये २ कोटींचे घबाड; एसआयटी चौकशी करणार मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आम्ही सत्य बाहेर आणू, अर्जुन खोतकर यांचे पीए निलंबित

धुळे जिल्ह्यातील एका सरकारी अतिथीगृहाच्या खोली क्रमांक १०२ मधून सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांची रक्कम सापडली. या रकमेवरून शिवसेना उबाठाचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी ही रक्कम शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर यांचेच पैसे असल्याचा आरोप केला. सदर रेस्ट हाऊसची ती खोली अर्जून खोतकर यांच्या …

Read More »

मुंबईसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळा रोडचा समावेश

अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

कर्जवाटप योजनेच्या नावाखाली लाभार्थ्यांना गंडा घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवाटप योजनेच्या नावाखाली व्याज परताव्यासाठी लागणारे प्रमाणपत्र (एलओआय)  लवकरात लवकर देण्याचे आमिष दाखवून लाभार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती अण्णासाहेब महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र : ‘महाविस्तार एआय’ ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास त्या कंपनीवर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही? शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू

देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिर गांधी व राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय वाशिम, महानगर गॅस, सुलवाडी जामफळ, अरूणा प्रकल्प, पोशीर आणि शिलार प्रकल्पाला निधी मंजूर

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पडली. या बैठकीत वाशिम येथील दिवाणी न्यायालयासाठी आवश्यक पदे उपलब्ध करून देणे, देवनार येथील भूखंड महानगर गॅसला सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय, सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेसाठी ५ हजार ३२९ कोटींची मान्यता, सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी, रायगडमधील पोशीर …

Read More »

अखेर माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश राज्यपालांकडून छगन भुजबळ यांना मंत्री पदाची शपथ

विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठा विजय मिळवित पुन्हा एकदा राज्यात सत्तास्थानी विराजमान झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यावरून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात राजकिय वादाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र काल रात्री उशीरा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे बँकाना आदेश, शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न घालता कर्ज द्या सन २०२५-२६ च्या ४४ लाख ७६ हजार ८०४ कोटींच्या पत पुरवठा आराखड्यास मंजुरी

शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका. बँकांना यापूर्वीही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापूर्वी यासंदर्भात निर्देश न जुमानणाऱ्या बँकावर ‘एफआयआर’ देखील दाखल केले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बँक शाखा सिबिल …

Read More »