Tag Archives: निवडणूक आयोग

आदर्श आचारसंहिता असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप वादग्रस्त संजय देसाई यांनी सेवानिवृत्त आधी केला पराक्रम

संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुनही नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता संजय देसाई यांनी ५० कोटींची निविदा उघडण्याचे धाडस दाखविले. नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निवडणूक आयोगाकडे करत निविदा रद्द करत गुन्हा दाखल करण्याची …

Read More »

उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश तथा भाजपा उमेदवार अभिजित गंगोपाध्याय २४ तासासाठी बॅन

भारतीय निवडणूक आयोगाने कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि पश्चिम बंगालमधील तमलूकमधील भाजपाचे उमेदवार अभिजित गंगोपाध्याय यांनी तृणमूल प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल त्यांना फटकारले आणि त्यांना संध्याकाळी आज ५ वाजल्यापासून २४ तास प्रचार करण्यास मनाई केली. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी ठामपणे सांगितले …

Read More »

अतुल लोंढे यांची पत्राद्वारे मागणी, …आचार संहितेचे उल्लंघन केल्याने कारवाई करा

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम १६ मार्च रोजी जाहीर झाल्याने त्यादिवसापासूनच आदर्श आचासंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी धोरणे व प्रकल्प जाहीर करणे हे मतदारांवर प्रभाव टाकणारे असून त्यातून सत्ताधारी पक्षाला लाभ मिळू शकतो असे असताना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने रस्त्यांसाठी बोली लावली आहे. हे आदर्श आचार संहितेचे …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात ६२.७१ टक्के मतदान

मागील काही दिवसापासून वातावरणातील उष्मा वाढत आहे. तर दुसऱ्याबाजूला लोकसभा निवडणूकीच्या प्रचारामुळेही राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. त्यामुळे लोकसभा उमेदवारासाठी मतदानाचा दिवस असूनही आपले राष्ट्रीय कर्तव्य अर्थात मतदार राजा सकाळ आणि संध्याकाळच्या कमी उन्हाच्या कालावधीतच घराबाहेर पडत आहे. यापार्श्वभूमीवर काल दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील आठ लोकसभा मतदारसंघात जवळपास …

Read More »

Supreme Court चा बॅलट पेपरला नकार मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटसाठी दिले हे आदेश

देशात लोकसभा निवडणूका ७ टप्प्यात होत आहेत. आतापर्यंत देशात चार टप्प्यात किंवा फार तर दोन टप्प्यात निवडणूका पार पाडल्या जात होत्या. मात्र यंदा पहिल्यांदाज देशातील लोकसभा निवडणूका सात टप्प्यात पार पडत आहेत. यापार्श्वभूमीवर ईव्हीएम मशिन्सच्या वापराबाबत अॅड प्रशांत भूषण यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त करत ईव्हीएम मशिन्सऐवजी लोकसभा निवडणूकीत …

Read More »

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई उत्तर पूर्व, २९- मुंबई उत्तर मध्य या चार मतदारसंघात शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. त्यासाठीची तयारी संबंधित चारही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेने केली असल्याची …

Read More »

पहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत करणार मतदारांना आवाहन

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कला, क्रीडा, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची ‘सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. पाहिल्यांदाच राज्यस्तरीय आणि जिल्हानिहाय सदिच्छादूत मतदारांना मतदानाचे महत्व समजून देण्यासाठी आवाहन करणार आहेत. समाज …

Read More »

महाराष्ट्रासाठी २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद

लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये ९८ हजार ११४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार संघासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे १ लाख ९६ हजार २२८ …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, चंद्रपूरच्या सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा

राज्याचे वन मंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश …

Read More »

लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ निवडणूक आयोगाची माहिती

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये ३३, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये …

Read More »