महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि आजूबाजूच्या ७ किलोमीटर पर्यंतच्या क्षेत्राला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अबाधित ठेवून उर्वरीत जलाशयाचा ८० किमीचा परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. …
Read More »येताय ना ? भंडारदरा आणि आंबोलीत वर्षा महोत्सवाचा आनंद लुटायला पर्यटन विभागाचा १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान मान्सून फेस्टिवल
पावसाची अनेकविध रुपे आपल्याला माहित आहेत. घराच्या कौलांवरून कोसळणार्या सरी, अंगणात साचलेल्या डब्यात विहरणार्या कागदाच्या होड्या, दूर रानात पानापानावर टपटपणारा मुसळधार पाऊस आणि एका छत्रीतल्या दोन जीवांना शीलगावणारा पाऊस… पाऊस म्हणजे उत्सव, पाऊस म्हणजे धमाल… पावसाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने येत्या १२ ऑगस्ट ते …
Read More »जलवाहतुक आणि पर्यटनासाठी फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार
जलवाहतूकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास अधिक चालना देण्यासाठी मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, फ्लोटेल वेटिंग एरिया प्लॅटफॉर्म व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेघदूत निवासस्थान येथे फ्लोटेल प्रकल्पाबाबत बैठक झाली. यावेळी आमदार मदन येरावार, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, …
Read More »
Marathi e-Batmya