Tag Archives: पहलगाम अतिरेकी हल्ला

बिहारमधून पंतप्रधान मोदी यांचा इशारा, दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मधुबनी येथील जाहिर सभेत बोलताना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. त्यानंतर बिहार मधील मधुबनी येथे आयोजित एका जाहिर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना, या हल्ल्यामागील दहशतवादी आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल असा इशारा दिला. पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मधुबनी येथील सभेत बोलत होते. यावेळी …

Read More »

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील या कराराला दिली स्थगिती सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर केली घोषणा

काल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी (२३ एप्रिल २०२५) पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. दरम्यान, सरकारने गुरुवारी (२४ एप्रिल २०२५) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दुपारी जम्मू आणि …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, पहलगाम प्रकरणी सर्वपक्षियांना बोलावून माहिती द्या कश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी याचा करावा तेवढा निषेध कमीच

जम्मू – काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला दुर्देवी आहे. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, …

Read More »

पहलगामला गेलेल्या पर्यटकांसाठी पवारांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांकडून विमान तर शिंदे हे स्वतः जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा पुढाकार

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली …

Read More »

राजनाथ सिंह यांचा इशारा, पडद्यामागे असलेल्यांपर्यंतही पोहचू… सूचक शब्दात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा

काश्मीरच्या पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्यात सामील असलेल्या लोकांना “नजीकच्या भविष्यात” जोरदार प्रत्युत्तर मिळेल आणि अशा कोणत्याही दहशतवादी कारवायांमुळे भारताला “भयभीत” करता येणार नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन कुरणात भेट देणाऱ्या पर्यटकांच्या गटावर गोळीबार केला, ज्यात दोन …

Read More »

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सरकारने केली विशेष रेल्वेची व्यवस्था

पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्री माता वैष्णो देवी (एसएमव्हीडी) कटरा येथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचे तिकिट कटरा, उधमपूर आणि जम्मू रेल्वे स्थानकावर मिळेल. रेल्वे क्रमांक : …

Read More »

पहलगाम दुर्घटनेतील महाराष्ट्रातील चार पार्थिव मुंबईत तर दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुण्यास रवाना राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाची माहिती

जम्मू व काश्मीर येथील पहलगाम येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील चार जणांचे मृतदेह हवाई मार्गे मुंबईला पाठविण्यात येत असून दोन पार्थिव दिल्ली मार्गे पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती जम्मू व काश्मीर प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. दिल्ली येथे येणाऱ्या पार्थिवांसोबत असलेल्या नातेवाईकांशी दिल्लीतील राजशिष्टाचार …

Read More »

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी सरकारकडून हेल्पलाईन जारी हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन-संपर्क क्रमांक :- 022-22027990

पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह …

Read More »