राज्यातील सिकलसेल या आनुवंशिक आजाराविरुद्ध सुरू असलेल्या अभियानाला वेग देण्यात आला असून आतापर्यंत ५९ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित तपासणी १५ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत सदस्य उमा खापरे यांनी उपस्थित …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे आदेश, सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करा आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेले उपचार मिशन मोडवर सुरू करावेत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. मुंबईतील “सुरुची” शासकीय निवासस्थानात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले …
Read More »राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात वेगाने राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या सर्व मोहिमा युद्धपातळीवर सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी अत्यंत …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढण्यासाठी शासनाबरोबरच समाजाचे योगदान आवश्यक पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत समित्या
राज्यातील स्त्री-पुरूष गुणोत्तर प्रमाण वाढावे यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच शासनपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी शासनाच्या यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य सर्वश्री हेमंत ओगले, बाबासाहेब देशमुख, नितीन …
Read More »नागरिकांनी कर्करोग तपासणीसाठी पुढे यावे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन कर्करोगाबाबत जागृती, तपासणी आणि उपचार अशा तीन स्तरावर मोहीम
राज्यात सर्व प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या तातडीने निदानासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. तपासणीसाठी नागरिकांमध्ये जागृती वाढविण्यात येत असून नागरिकांनी या तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले की, कर्करोग तपासणीसाठी राज्यात सध्या आठ …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, पॅलियेटिव्ह केअर आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी आणखी एक पाऊल पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रम शुभारंभ व मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय लोकार्पण
राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आरोग्य संपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासनाने आरोग्य सेवेत आणखी एक पाऊल पुढे टाकत राज्यात ‘पॅलियेटिव्ह केअर’ कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पॅलियेटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ, मेनोपॉज क्लिनिकचे राज्यस्तरीय …
Read More »प्रकाश आबिटकर यांचा मोठा निर्णय, नवीन पदभरतीत ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण आदिवासी भागातील रिक्तपदे भरण्याचा क्रांतिकारी निर्णय
राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागातील नवीन पदभरती करताना, व सेवांतर्गत पदव्युतर पदवी उत्तीर्ण झालेल्या (पीजी) उमेदवाराना प्रथम आदिवासी भागात नियुक्ती देण्यात येऊन रिक्त पदे भरण्यात येतील. त्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येतील. गेल्या वर्षभरात …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, बदल्या-पदोन्नती करताना एसएचआरसीच्या मूल्यांकनानुसार कार्यवाही करा आरोग्य विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश
सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले की, केंद्र शासनाची ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एनएचएसआरसी) नवी दिल्ली’ ही …
Read More »केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार
राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, शासकीय जनआरोग्य योजनांतून कोणालाही उपचार नाकारू नका खासगी किंवा शासकीय रूग्णालयांना आदेश
राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला शासकीय आरोग्य योजनांतून विनासायास, मोफत आणि प्रभावी उपचार मिळालेच पाहिजेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या कोणत्याही खासगी अथवा शासकीय रुग्णालयाने कोणत्याही कारणास्तव रुग्णाला उपचार नाकारू नयेत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. प्रधानमंत्री जनआरोग्य …
Read More »
Marathi e-Batmya