Breaking News

Tag Archives: मालवण

रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, शिवाजी महाराजांचा पुतळा… निर्णय चुकीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मालवण मधील राजकोट किल्ल्याला भेट

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुःखद मनाला चटका लावणारी आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम नवोदित शिल्पकारास देण्याचा निर्णय चुकीचा होता. राज्यात राम सुतार आणि सारंग सारखे ज्येष्ठ अनुभवी शिल्पकार असताना नवोदितांना ही मोठी जबाबदारी …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, त्या कृत्यांबद्दल काँग्रेस माफी मागणार का? शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडल्याच्या निषेधार्थ विरोधक महाविकास आघाडीच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारत भलामोठा मोर्चा काढला. या मोर्चात शिवद्रोही सरकार म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून चुकीला माफी …

Read More »

जोडे मारो आंदोलनः शरद पवार यांचा आरोप, मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्टाचाराचा… शिवप्रेमी जनतेचा अपमान केला

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्यानिमित्ताने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चाचा समारोप गेट वे येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, महाराजांचा नवा पुतळा उभारणार, समितीची स्थापना वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली, अखेर माफी त्याच ठिकाणी दुसरा पुतळा उभारणार

मालवणमधील शिवाजी महाराज पुतळा आठ महिन्यातच कोसळून पडला. या पुतळा प्रकरणावरून राज्यातील सर्व राजकिय पक्षांनी सत्ताधाऱांना धारेवर धरायला सुरुवात केली. तसेच या घटनेवरून राजकिय कुरघोडी नाट्याला सुरुवातही झाली. यावरून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना माफी मागितली. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …

Read More »

सतेज पाटील याची टीका, राज्य सरकारने आपले अपयश नौदलाच्या माथी मारू नये छत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही लाजिरवाणी बाब: पृथ्वीराज चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून राजकीय इव्हेंट करत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला त्याचा लोकसभेसाठी राजकीय इव्हेंट केला. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार आणि काम निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळेच तो कोसळला, महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का दिला आहे. मालवणमध्ये घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री …

Read More »

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अखेर आशिष शेलार यांची सरकारच्यावतीने माफी सर्वचस्थरातून टीकेचा भडीमार सुरु झाल्यानंतर अखेर माफीनामा

मालवण येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाचे औचित्य साधत करण्यात आले. त्यास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही तोच पुतळा कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झो़ड उठली. विरोधकांबरोबरच अनेक शिवप्रेमी आणि विविधस्तरांतूनही टीकेची झोड …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पुतळा पडल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारे सरकार…. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी …

Read More »

जयंत पाटील यांची टीका, शिवाजी महाराजांच नाव वापरायचं… सन्मानाबाबत घेणेदेणे नाही पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय

मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यातच कोसळला मालमणमधील सिंधुदूर्ग किल्याच्या किनारी वसविण्यात आलेला पुतळा

नौदल दिनाचे औचित्य साधत भारतीय नौदलाचे पहिले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मालवण येथील सिंधूदुर्ग किल्ल्याच्या समुद्र किनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले. तसेच त्यादिवशी नौदलाचे संचलनही झाले. या पुतळा अनावरणास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण झाला नाही तोच हा पुतळा कोसळून पडल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पुतळा …

Read More »