Tag Archives: मुख्यमंत्री

अपात्र धारावीकरांचे पुर्नवसन कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेवर होणार धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील मदर डेअरीची जमीन हस्तांतरणाच्या करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणा

मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील मदर डेअरी अर्थात मातृदुग्धशाळेची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी १४ जून २०२४ च्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषी तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा 'क्लिन प्लांट’कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पहिल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’च्या पारितोषिक वितरण आणि समारोप सभारंभात ते बोलत होते. कृषी …

Read More »

कामगार विमा महामंडळाच्या रूग्णालयासाठी छत्रपती संभाजीनगर करोडीतील ५ एकर जमीन महामंडळांच्या प्रस्तावित अन्य ९ रुग्णालयांना जमीन देण्यास मान्यता

छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी १५ एकर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यासह बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती(पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित रूग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्वतः मान्यता …

Read More »

राज्य सरकारचा निर्णय, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे आज बैठक झाली. या बैठकीच्या सुरवातीला राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा …

Read More »

आमदार रईस शेख यांची, गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे गोसेवा आयोगाचे पत्र मागे कत्तलीचे शुल्क वर्षभर २० रुपये करण्याची शेख यांची मागणी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ जून ते ८ जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भात राज्य गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवलेले वादग्रस्त पत्र मागे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. यासंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सह्याद्री अतिथीगृह येथे बकरी ईदच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने एनटीपीसीच्या सीएसआर फंडातून एम्समध्ये बोन मॅरो युनिटसाठी अर्थसाहाय्य एम्स नागपूरमध्ये बोन म‌ॅरो ट्रान्सप्लांट केंद्रासाठी एनटीपीसीचे महत्त्वपूर्ण योगदान

विदर्भातील सिकल सेल आणि थायलेमिया ग्रस्त रुग्णांना नजीकच उपचारांची सोय व्हावी आणि त्यांचे उपचारांसाठी मुंबईवर असलेले अवलंबित्व कमी व्हावे यासाठी एम्स नागपूर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. या संकल्पनेस सकारात्मक प्रतिसाद देत एनटीपीसीने या युनिटसाठी अर्थसाहाय्य दिले आहे. याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची आशा, ‘चक्र’च्या माध्यमातून संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअपला बळ सामान्य माणसालाही सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याच्यादृष्टीने चक्र उपयुक्त ठरणार

विद्यापीठे ही केवळ शिक्षणसंस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नये तर संशोधन, नाविन्यता आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्रे व्हावीत. त्यादृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले उत्कृष्टता केंद्र आणि कंपनी कायद्यांतर्गत सुरू केलेले ‘चक्र’ ( सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) हे उपयुक्त ठरेल. आताच्या उपक्रमातून सामान्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, जग स्तिमित होईल, असाच कुंभमेळा होणार नाशिक येथे कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठक, कुंभमेळ्याचे मुहुर्त

कुंभमेळा सुरक्षित, निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल. कुंभमेळा भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतीक असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे आहे. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने जग स्तिमित होईल असे भव्य दिव्य …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अहिल्यादेवींचा आदर्श घेत शासन वंचितासाठी काम करणार श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष, राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक …

Read More »