राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या माध्यमातून राजकारणातील ध्येय, मनातील विचार संवादात्मक पद्धतीने मांडण्यासाठी व आपल्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्ट्रीय विधायक संमेलन भारततर्फे देशातील आमदारांसाठी दोन दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रम एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरुड येथे आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी …
Read More »चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० हून अधिक !
महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मोठ्या गुंतवणुकीमुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार अॅडव्हान्टेज विदर्भ २०२५- खासदार औद्योगिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन
गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत आहे. पर्यटन, उद्योग व दळण-वळण अशा अनेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून मोठ्या गुंतवणुकीमुळे तसेच ‘ॲडव्हांन्टेज विदर्भ’ या महोत्सवाच्या आयोजनामुळे येत्या काळात विदर्भ उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येणार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला
जलव्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, कायदा व सुव्यवस्था, महिलांचे संरक्षण, सर्व जातीधर्माचा सन्मान असा आदर्श वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभाराच्या माध्यमातून दिला आहे. हा समृद्ध वारसा जपण्यासह तो नव्या पिढीपर्यंत प्रवाहित होण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर कविवर्य सुरेश भट सभागृह …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती देशात औद्यागिक क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य
औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य असून, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव येथील हॅवमोर लोट्टे आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग …
Read More »एकनाथ शिंदे यांना धक्काः आयएएस संजय सेठी यांची एसटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नियुक्ती
मुंबई राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अध्यक्षपदी लोकप्रतिनिधी ऐवजी आयएएस अधिकारी संजय सेठी यांची नियुक्ती केली आहे. यामुळे एक नवीन वाद निर्माण होऊ शकतो, कारण गेल्या दशकापासून परिवहन मंत्री किंवा इतर कोणीतरी लोकप्रतिनिधी या पदावर विराजमान आहेत. सध्या परिवहन विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मंत्री …
Read More »महाकुंभ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डुबकी आणि दिल्लीतील मतदान सर्वाधिक डुबकी तर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नावावर
नवीन कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धेच्या ठिकाणी काहीतरी करतात, जो चर्चेचा विषय बनतो. आता प्रयागराजची महाकुंभ मेळा घ्या. येथील पवित्र संगमामध्ये त्यांनी केलेली डुबकीदेखील चर्चेचा विषय आहे. ते अशा वेळी दिल्लीतील दिल्लीकर मतदान करत होते, सत्ताधारी पक्षाची किंवा विरोधी पक्षाची बोट बुडवण्यासाठी मतदान करत होते. तसे पाहता, सनातन धर्मावर विश्वास …
Read More »रिलायन्स करणार ५० हजार कोटींची गुंतवणूक पश्चिम बंगालमध्ये मुकेश अंबानी यांनी दिली माहिती
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की दशकाच्या अखेरीस समूह पश्चिम बंगालमधील त्यांची गुंतवणूक दुप्पट करेल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत पश्चिम बंगाल गुंतवणूक शिखर परिषदेत अंबानी बोलत होते. “बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी रिलायन्सची वचनबद्धता अढळ आहे. २०१६ मध्ये, जेव्हा मी पहिल्यांदा या शिखर परिषदेला उपस्थित होतो, …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, शिवभोजन थाळी योजना पूर्ववत सुरू ठेवा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
राज्यातील गोर गरीब गरजू नागरिकांसाठी राज्यात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना यापुढील काळातही पूर्ववत सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन …
Read More »भाजपाचे सदस्य बनविण्यासाठी नेत्यांना फुटतोय घामः देवेंद्र फडणवीस संतापले सदस्यांचे टार्गेट पूर्ण करण्यात कमी पडलेल्या आमदारांची दांडी
महाराष्ट्र भाजपाला संघटना महोत्सवाअंतर्गत १.५ कोटी नवीन सदस्यांची भरती करण्यात अडचण येत आहे. जानेवारीमध्ये सुरू झालेल्या सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत फक्त ९८ लाख सदस्यांची नोंदणी झाली. १५ फेब्रुवारीपर्यंत ५२ लाख नवीन सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट कसे साध्य करायचे यावर सध्या भाजपामध्ये विचारमंथन सुरू आहे. दरम्यान जानेवारी महिन्यात सदस्य नोंदणीच्या अभियानाला सुरुवात …
Read More »
Marathi e-Batmya